भारताविरुद्धच्‍या पराभवाने पाकिस्‍तानचा पाय खोलात! ‘सुपर -8’ची वाट खडतर

भारताविरुद्धच्‍या पराभवाने पाकिस्‍तानचा पाय खोलात! ‘सुपर -8’ची वाट खडतर

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : रविवारी टी-20 विश्‍वचषक स्‍पर्धेत भारत आणि पाकिस्‍तान आमने-सामने होते. संपूर्ण क्रिकेटविश्‍वाचे या अटीतटीच्‍या लढतीकडे लक्ष वेधले होते. अंतिम क्षणी अत्‍यंत रोमहर्षक झालेल्‍या सामन्‍यात पाकिस्‍तानचा पराभव झाला. या स्‍पर्धेतील पाकिस्‍तानचा हा सलग दुसरा पराभव ठरला आहे. त्‍यामुळे आता यापुढील पाकिस्‍तानचे आव्‍हान आणखी खडतर झाले आहे.
सुपर-8 मध्ये प्रवेशसाठी दोन्‍ही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागणार
टी-20 विश्‍वचषक स्‍पर्धेत पाकिस्‍तानविरुद्धचा सामना भारताने जिंकला. या स्‍पर्धेत भारताने सलग दुसरा दिमाखदार विजय नोंदवत ‘अ’ गटातील आपलं अग्रस्‍थान कायम ठेवले आहे. तर सलग दोन सामन्‍यात पराभवामुळे पाकिस्‍तानचा संघ अडचणी आतला आहे. दोन सामन्यांत सलग दोन विजयांसह भारताचे चार गुण आहेत. भारताचा नेट रन रेटही 1.455 झाला आहे. या गटात सलग दोन पराभवामुळे आता पाकिस्तान चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. आता टी-२० विश्‍वचषक स्‍पर्धेच्‍या सुपर-8 मध्ये पोहोचण्यासाठी पाकिस्‍तान संघाला मोठ्या फरकाने दोन्ही सामने जिंकावे लागतील. ११ जून रोजी पाकिस्‍तान संघ कॅनडाविरुद्ध सामना खेळेल तर १६ जुन रोजी आयर्लंडविरुद्ध सामना होणार आहे. या दोन्ही सामन्यात पाकिस्तानला मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागणार आहे.
कर्णधार बाबरने सांगितले पराभवाचे कारण
भारताविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने आपल्या संघाची कुठे चूक झाली हे पत्रकार परिषदेत सांगितले. तो म्हणाला, “आम्ही चांगली गोलंदाजी केली. मात्र फलंदाजी करताना आम्ही विकेट गमावत राहिलो. तसेच आमच्‍या फलंदाजी र्निधाव चेडूही अधिक खेळले. आम्‍ही सामन्‍य फलंदाजी केली असती तरी विजय झाला असता; पण आम्ही खूप डॉट बॉल खेळलो. तळातील फलंदाजांकडून फारशी अपेक्षा करता येणार नाही. पॉवर प्‍लेमध्‍ये जोरदार फटकेबाजी करण्‍याचा आमचा प्रयत्‍न होता;पण एक विकेट गेल्‍याने आम्‍हाला मर्यादा आल्‍या. म्ही पहिल्या सहा षटकांत चांगली कामगिरी केली नाही.”
काय घडलं मॅचमध्ये?
भारताने रोमहर्षक सामन्यात पाकिस्तानचा सहा धावांनी पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाला १९ षटकांमध्‍ये केवळ ११९ धावांपर्यंत मजल मारता आली. प्रत्युत्तरात पाकिस्तानची सुरुवात दमदार झाली. 14व्या षटकात पाकिस्तानने तीग गडी गमावत ८० धावा केल्‍या होत्‍या. रिझवान-शादाब बाद झाले आणि सामन्‍याला कलाटणी मिळाली.. जसप्रीत बुमराह 19व्या षटकात गोलंदाजीला आला आणि त्याने केवळ तीन धावा देत इफ्तिखारची विकेट घेतली. 20व्या षटकात पाकिस्तानला विजयासाठी 18 धावांची गरज होती. मात्र, अर्शदीपने केवळ 11 धावा देत इमाद वसीमला तंबूत धाडले. बुमराह-अर्शदीप, सिराज आणि हार्दिकच्या वेगवान गोलंदाजीने भारताला विजय मिळवून दिला. पाकिस्तान संघाने 20 षटकांत ७ गडी गमावत ११३ धावा केल्‍या.
हेही वाचा :

IND vs PAK : टीम इंडिया बाजीगर..! टी-20 विश्वचषकात पाकिस्तानवर सातवा विजय
ICC Men’s T20 World Cup : T20 मध्‍ये टीम इंडियाचा ‘किंग’,अशी कामगिरी करणारा ठरला पहिला संघ