भारत-पाकिस्‍तान सामन्यावर पावसाचे ढग

भारत-पाकिस्‍तान सामन्यावर पावसाचे ढग

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : टी-20 विश्वचषक स्पर्धेतील बहुचर्चित भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना रविवारी (दि.9) होणार आहे. या हाय व्होल्टेज सामन्याकडे संपूर्ण किक्रेट जगताचे लक्ष लागले आहे; परंतु, या हायव्होटेज सामन्यात वरूणराजा दमदार फलंदाजी करण्याची शक्यता आहे. AQ Weather च्या रिपोर्टनुसार, न्यूयॉर्कमध्ये रात्री 11 वाजता म्हणजेच रात्री 8:30 वाजता भारतात पावसाची शक्यता 51 टक्के आहे.
मैदानात वरूनराजा बरसणार?
रविवारी हा सामना नासाऊ काउंटी स्टेडियमवर होणार आहे. अमेरिकेच्या स्थानिक वेळेनुसार हा सामना सकाळी साडेदहा वाजता सुरू होईल. परंतु, भारतात हा सामना रात्री आठ वाजता सुरू होईल. AQ Weather च्या रिपोर्टनुसार, सामन्यादरम्यान पावसाची शक्यता 51 टक्के आहे. परंतु, स्पर्धेत साखळी फेरीतील सामन्यासाठी कोणताही अतिरिक्त दिवस ठेवण्यात आलेला नाही. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना रद्द झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल. आयसीसीने उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीतील सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवला आहे. परंतु, साखळी फेरीतील सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही.
सुपर 8मध्ये स्थान निश्चित करण्यासाठी सामन्यात विजय आवश्यक
रविवारी (दि.9) होणारा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. भारताने पहिल्या सामन्यात आयर्लंडला हरवून स्पर्धेमध्ये विजयी सुरूवात केली. विजयासह टीम इंडियाने दोन गुणांची कमाई केली. तर, पाकिस्तानला पहिल्याच सामन्यात अमेरिकेकडून पराभवाचा पत्करावा लागला. यामुळे स्पर्धेत टिकून राहण्यासाठी पाकिस्तानचा संघासाठी हा सामना महत्त्‍वपूर्ण ठरणार आहे.