पुणे: माळेगाव येथे गर्भलिंग निदान करणाऱ्या डाॅक्टरसह एजंटला अटक

पुणे: माळेगाव येथे गर्भलिंग निदान करणाऱ्या डाॅक्टरसह एजंटला अटक

बारामती: Bharat Live News Media वृत्तसेवा :  गर्भलिंग निदान करण्यास कायद्याने बंदी असताना बारामती तालुक्यातील माळेगावमध्ये डाॅक्टरसह त्याच्या साथीदाराने एका  महिलेची गर्भलिंग चाचणी केली. या प्रकरणी दोघांविरोधात माळेगाव पोलिस ठाण्यात लिंग निवडीस प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करत दोघांना अटक केली. शुक्रवारी (दि. ७)  सायंकाळी पाचच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
डाॅ. मधुकर चंद्रकांत शिंदे (वय ५२, रा. लक्ष्मीनगर, फ्लॅट नं. २९, फलटण, जि. सातारा) व त्याचा साथीदार नितीन बाळासो घुले (वय ३४, रा. ढेकळवाडी, ता. बारामती) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी माळेगाव पोलिस ठाण्यात बारामतीच्या सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डाॅ. महेश सोपानराव जगताप यांनी फिर्याद दिली.
माळेगावातील गोफणे वस्तीनजीक एका ठिकाणी बांधकाम सुरु आहे. तेथे डाॅ. शिंदे व त्याचा एजंट घुले यांनी एका महिलेची गर्भनिदान चाचणी केली. घटनेच्या ठिकाणी ते सोनोग्राफी मशिनसह आढळून आले. त्यांच्या विरोधात पीसीपीएनडीटी कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही वाचा 

Pune car accident case | पुणे अपघात प्रकरण; अल्पवयीन आरोपीच्या वडील, आजोबांवर आणखी एका प्रकरणात गुन्हा दाखल
LokSabha Elections2024 : पुणेकरांचा विश्वास सार्थ ठरविणार; खा. मुरलीधर मोहोळ
रेल्वे डब्यांची संख्या कधी वाढवणार? पुणे- मुंबई- पुणेदरम्यानची स्थिती