Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: नासाच्या अपोले ८ मोहिमेतील अंतराळवीर बिल अँड्रेस (William Anders) यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. एका विमान अपघातात वयाव्या ९० व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला, अशी माहिती त्यांचा मुलगा ग्रेग यांनी दिली आहे. या संदर्भातील वृत्त ‘बीबीसी’ने दिले आहे.
अंतराळवीर बिल अँड्रेस उड्डाण करत असलेले एक छोटे विमान वॉशिंग्टन राज्याच्या समुद्रात कोसळले, असे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीत म्हटले आहे. तर अँड्रेस (William Anders) यांचा मुलगा ग्रेग यांनी शुक्रवारी (दि.७ जून) दुपारी वडिलांचा मृतदेह सापडल्याची पुष्टी केली. कुटुंबाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, “बिल अँड्रेस यांच्या मृत्यूने आमचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. ते एक उत्तम पायलट होते. त्याची उणीव नेहमीच भासणार आहे.”
अंतराळावीर बिल अँड्रेस (William Anders) हे नासाच्या अपोलो ८ मोहिमेवरील पायलट होते. या मोहिमेदरम्यान त्यांनी अर्थराईजचे प्रसिद्ध छायाचित्र टीपले होते. जे अंतराळातून टीपलेले पृथ्वीचे सर्वात संस्मरणीय आणि प्रेरणादायी छायाचित्रांपैकी एक आहे.
नासाचे अपोलो ८ हे १९६८ मध्ये ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला पृथ्वीवरून चंद्रावर झेपावणारे पहिले क्रू स्पेस फ्लाइट होते. अंतराळावीर बिल अँड्रेस यांनी चंद्रावरून पृथ्वी उदयाचे छायाचित्र टीपले होते. या छायाचित्रावरून चंद्राच्या नापीक पृष्ठभागावरून क्षितिजाच्या वरती ग्रह दिसतो, असे भासत होते. अंतराळ कार्यक्रमातील सर्वात महत्त्वपूर्ण योगदान म्हणून अँड्रेर्सच्या (William Anders) कामाचे वर्णन केले जाते.
90-Year-Old William Anders, a Former NASA Astronaut and Major General with the U.S. Air Force was Killed earlier today after his Beechcraft T-34 “Mentor” Propeller-Driver Trainer Aircraft reportedly Crashed near his Home on Orcas Island in Washington State. Anders was a Member of… pic.twitter.com/xx47ug51k1
— OSINTdefender (@sentdefender) June 8, 2024