अकोला: पेट्रोलपंप व्यावसायिकावर चाकू हल्ला करुन ३ लाख लांबविले

अकोला: पेट्रोलपंप व्यावसायिकावर चाकू हल्ला करुन ३ लाख लांबविले

अकोला, Bharat Live News Media वृत्तसेवा: जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील पेट्रोलपंप व्यावसायिकावर घरी जाताना अज्ञात चोरट्यांनी  गाडी अडवून चाकूने हल्ला करत ३ लाख  लंपास केले. ही घटना शुक्रवारी रात्री (दि. ७) घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील  मूर्तिजापूर येथील दिनेश भगवानदास  बुब यांचा  पेट्रोलपंप आहे. शुक्रवारी ते नेहमीप्रमाणे आपल्या पेट्रोल पंपावर चार चाकी गाडीने गेले असता अंदाजे १ वाजेदरम्यान ते पेट्रोल पंपावरील तीन लाख रुपये घेऊन परत मूर्तिजापूरकडे येत होते. यावेळी महामार्गावर त्यांची गाडी अज्ञातांनी अडवून त्यांच्यावर चाकूने वार करून गंभीर
जखमी केले. त्यानंतर बुब यांच्याजवळ तीन लाख रोख असलेली बॅग घेऊन चोरटे पसार झाले.

गंभीर जखमी झालेल्या दिनेश बुब यांना तत्काळ अकोला येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे, सिटी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भाऊराव घुगे, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कैलास भगत, गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक शेळके,अतिरिक्त पोलीस उपअधीक्षक डोगरे आदी घटनास्थळी दाखल झाले.  या प्रकरणी पोलिसांची पुढील कारवाई सुरू आहे.

हेही वाचा 

Lok sabha Election 2024 Results : अकोला: भाजपचे अनुप धोत्रे विजयी; अभय पाटील, प्रकाश आंबेडकरांचा पराभव
अकोला: आरटीई प्रवेश प्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ
अकोला शहरातील पाणीपुरवठा दोन दिवस बंद