बीड : माजलगाव येथील हिवरा बु. गावात वीज पडून ९ मेंढ्यांचा मृत्यू

बीड : माजलगाव येथील हिवरा बु. गावात वीज पडून ९ मेंढ्यांचा मृत्यू

माजलगाव; Bharat Live News Media वृत्तसेवा : तालुक्यातील हिवरा बु. गावात वीज पडून रामकिसन टकले या मेंढपाळांच्या तब्बल ९ दगावल्या. शुक्रवारी (दि.७) रात्री ९.३० च्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यादरम्यान वीज पडल्याने ही दुर्घटना घडली.
गेवराई तालुक्यातील रसुलाबाद येथील रामकिसन टकले, किरण काळे आपल्या मेंढ्या चारण्यासाठी हिवरा या गावी आले होते. शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यादरम्यान वीज पडल्याने रामकिसन टकले यांच्या ८ मेंढ्या आणि किरण काळे यांची १ अशा ९ मेंढ्यांचा मृत्युमुखी पडल्या. याची माहिती देण्यात माजलगाव तहसीलदार वर्षा मनाळे यांना देण्यात आली. त्यानंतर मंडळ अधिकारी, तलाठी यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.
हेही वाचा : 

कल्याणच्या शिवसेना शहरप्रमुखांना धमकावल्याप्रकरणी एकास अटक

बीड: हायवा- छोटा हत्ती गाडीची धडक; ३ जण जखमी

बीड: केज येथे ३ हजारांची लाच घेताना मुख्याध्यापक ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात