वडील शत्रुघ्न सिन्हांच्या विजयानंतर सोनाक्षीची इमोशनल पोस्ट

वडील शत्रुघ्न सिन्हांच्या विजयानंतर सोनाक्षीची इमोशनल पोस्ट

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : पश्चिम बंगालच्या आसनसोल मधून दिग्गज अभिनेते शत्रुघ्न सिन्हा विजयी झाले आहेत. लोकसभा निवडणुकीतील वडिलांच्या विजयानंतर मुलगी आणि बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने उत्सव साजरा केला आहे. आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर आसनसोलच्या जनतेचे आभार मानले. त्यांनी सेलिब्रेशनची एक झलक शेअर केलीय यामध्ये तिने तिच्या वडिलांच्या चेहऱ्यांवरील हास्य टिपले.सोनाक्षीने स्पष्ट केले की, ती आपल्या वडिलांच्या विजयाने खूप खुश आहे.
अधिक वाचा –

कंगनाने मोदींचा फोटो शेअर करून पुन्हा वेधलं लक्ष, या फोटोची खास बात आहे तरी काय?

सोनाक्षीने शेअर केला वडिलांचा फोटो
तिने इन्स्टाग्राम स्टोरीज सेक्शनमध्ये शत्रुघ्न सिन्हा यांचा फोटो आणि व्हिडिओ शेअर केला आहे. तिने पहिल्या स्टोरीत लिहिलं, ‘आसनसोलच्या जनतेचे धन्यवाद.’ दुसऱ्या फोटोत लिहिलंय, ‘ते विजयाचे हास्य’. या फोटोमध्ये शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांची पत्नी पूनम एकत्र दिसले. त्यामध्ये विक्ट्री साईन दाखवताना दोघे दिसत आहेत. दोघांच्या चेहऱ्यावर विजयाचा आनंद पाहायला मिळत आहे. शत्रुघ्न सिन्हाने आसनसोल लोकसभा जागेवर भाजपाचे उमेदवार सुरेंद्रजीत सिंह अहलूवालियाला 59,564 मतांनी हरवलं.
अधिक वाचा –

रितेश देशमुखने वडील विलासराव देशमुखांचा ‘तो’ व्हिडिओ केला पोस्ट

सोनाक्षीने मागितली होती वडिलांसाठी मते
आसनसोलमध्ये लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात १३ मे, २०२४ रोजी मतदान झाले. आसनसोलमध्ये मतदान दिवशीच्या आधी सोनाक्षी सिन्हाने जनतेला मते देण्याची विनंती केली होती. आपल्या वडिलांना प्रामाणिक, दूरदर्शी आणि प्रतिबद्ध असणारा नेता सांगत आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर लिहिलं की, “आसनसोल…आज आपली मते देण्याची वेळ आहे…आपली मते खूप महत्त्वाची आहेत, प्रगती, एकता आणि समृद्धीसाठी महत्व द्या.”

शत्रुघ्न सिन्हा यांचा इतक्या मतांनी झाला विजय
शत्रुघ्न सिन्हा यांनी 605645 मते मिळवत भाजप उमेदवार सुरेंद्रजीत सिंह यांना पिछाडीवर टाकले. टीएमसी खासदार शत्रुघ्न सिन्हा आधी आसनसोलमधून खासदार होते. त्यांनी याच जागेवरून पुन्हा निवडणूक लढवली आणि दुसऱ्यांदादेखील त्यांना जनतेचे समर्थन मिळाले.
अधिक वाचा –

‘कल्की 2898 AD’मधील प्रभासची झलक समोर, ट्रेलरची उत्सुकता