NDAवर जनतेचा सलग तिसऱ्यांदा विश्वास, हा ऐतिहासिक क्षण : मोदी

NDAवर जनतेचा सलग तिसऱ्यांदा विश्वास, हा ऐतिहासिक क्षण : मोदी

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘४०० पार’चा नारा दिलेला असताना NDAला प्रत्यक्षात ३०० जागाही मिळवता आलेल्या नाहीत, अशी स्थिती आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली प्रतिक्रिया पुढे आलेली आहे.
एक्स पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेचे आभार मानले आहेत. ‘लोकांनी NDAवर तिसऱ्यांदा विश्वास व्यक्त केला, भारताच्या इतिहासातील हा ऐतिहासिक क्षण आहे,” असे त्यांनी म्हटले आहे.
जनता जनार्दनसमोर मी नतमस्तक होत आहे, गेल्या दशकभरात लोकांच्या अपेक्षांची पूर्तता करताना जी चांगली कामे केली आहेत, ती पुढे सुरू राहतील. मी आमच्या कार्यकर्त्यांना नमन करोत. त्यांनी केलेल्या कष्टांची भरपाई शब्दांतून होणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

People have placed their faith in NDA, for a third consecutive time! This is a historical feat in India’s history.
I bow to the Janata Janardan for this affection and assure them that we will continue the good work done in the last decade to keep fulfilling the aspirations of…
— Narendra Modi (@narendramodi) June 4, 2024

Go to Source