काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांची विजयाकडे वाटचाल

काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांची विजयाकडे वाटचाल

सोलापूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी रामवाडी येथील शासकीय गोदामात सकाळी नऊ वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाली आहे. दरम्यान एकोणिसाव्या फेरीपर्यंत काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी मोठी मजल मारली आहे. आमदार शिंदे तब्बल 50 हजार 258 मतांची आघाडी मिळवत विजयाच्या वाटेवर आहेत. त्यामुळे यंदाच्या लोकसभेत भाजपची हॅट्रिक हुकणार आहे. तसेच काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपच्या विजयाला ब्रेक लावला आहे.
प्रारंभी टपाली मतदानात काँग्रेसने आघाडी घेतली. ईव्हीएम मशीनच्या दुसऱ्या फेरीतही काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी लीड घेतली. त्यानंतर तिसऱ्या पासून ते सातव्या फेरीपर्यंत भाजपचे आमदार राम सातपुते यांनी आघाडी घेतली होती. मात्र आठव्या फेरीपासून ते एकोणिसाव्या फेरीपर्यंत काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी 50 हजारांपेक्षा अधिक मतांनी आघाडी घेतली आहे. त्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघात आमदार प्रणिती शिंदे या विजयाच्या वाटेवर आहेत. दरम्यान अजून सात फेऱ्यांचे निकाल येणे बाकी आहेत.
हेही वाचा :

निवडणुकीच्या काळात जनता मालक असते : नाना पटोले
हमीरपूरमधून अनुराग ठाकूर पाचव्यांदा विजयी
लातूरमध्ये ‘काँग्रेसचे डॉक्टर’ काळगे यांची विजयाकडे वाटचाल