मोदी पिछाडीवर होते हाच देशाचा कल: संजय राऊत

मोदी पिछाडीवर होते हाच देशाचा कल: संजय राऊत

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी सुरूवात झाली. हाती आलेल्या पहिल्या कलानुसार एनडीए आणि इंडिया आघाडीमध्ये काट्याची लढत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. वाराणसीतून पंतप्रधान मोदी पिछाडीवर होते हाच कल असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, देशभरात इंडिया आघाडी २९५ पेक्षा जास्त जागा जिंकेल. तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीला जास्तीतजास्त जाग मिळतील. भाजपने जो प्रोपोगंडा केला होता. तो चुकीचा होता खोटा होता हा आज संध्याकाळी सिद्ध होईल. हा उत्तर प्रदेशाचा कल नाही, तर देशाचा कल आहे, असेही ते म्हणाले. इंडिया आघाडी जिंकली, तर कॉग्रेस नेते राहुल गांधी हेच पंतप्रधान पदाचे पहिले चॉईस असतील, असे राऊत म्हणाले.
हेही वाचा    

Nashik Breaking | नाशिकमधून राजाभाऊ वाजे तब्बल 30 हजार मतांनी आघाडीवर
अमोल कोल्हे एक लाखा पार; अढळराव पिछाडीवर
Lok Sabha Election 2024| मताधिक्क्य कायम