अनुपम खेर यांच्या ऑफिस चोरी प्रकरणी २ सराईट चोरट्यांना अटक

अनुपम खेर यांच्या ऑफिस चोरी प्रकरणी २ सराईट चोरट्यांना अटक

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : सिनेअभिनेते अनुपम खेर यांच्या अंधेरीतील कार्यालयात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून सुमारे चार लाखांची रोकड आणि एक निगेटिव्ह रिळ चोरी केली होती. याप्रकरणी आता ओशिवरा पोलिसांनी दोन सराईट चोरट्यांना अटक केली आहे. मजीद शेख आणि मोहम्मद दलेर बर्हीम खान अशी चोरट्यांची नावे आहेत. दोन्ही सराईट चोरटे अशून त्यांनी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी चोरी केल्याचे समोर आले आहे.
अधिक वाचा –

‘कल्कि 2898 एडी’ दुसरा ट्रेलर; दीपिकाची लक्षवेधी भूमिका (Video)

अनुपम खेर यांच्या कार्यालयात चोरी झाल्यानंतर आंबोली पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद केली होती. कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजवरुन दोन तरुणांनी आत प्रवेश करुन ही चोरी केल्याचे उघडकीस आले.
अधिक वाचा –

गुरमीत चौधरीच्या ‘महाराणा’ वेब सीरीजचे शूटिंग बंद, नितीन देसाईंच्या मृत्यूनंतर मोठा निर्णय

नेमकं प्रकरण काय?
अनुपम खेर यांचे अंधेरीतील विरा देसाई रोडवर एक खासगी कार्यालय आहे. बुधवारी त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी काम संपल्यानंतर लॉक लावून निघून गेले होते. रात्री उशिरा दोन तरुण त्यांच्या कार्यालयात घुसले होते. त्यांनी ड्रॉवरमधील चार लाखांची कॅश आणि एक निगेटिव्ह रिळ घेऊन पलायन केले होते. हा संपूर्ण प्रकार कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला होता.
अधिक वाचा –

रूबाबदार कालिन भैया-गुड्डू पंडितचा धमाका, ‘मिर्जापूर ३’ ट्रेलर रिलीज

#UPDATE | Mumbai: Two people – Majid Sheikh and Mohammad Daler Bahrim Khan – arrested by Oshiwara Police for committing theft at the office of actor Anupam Kher. Both of them are serial thieves and commit thefts in different areas of the city. https://t.co/p3oFbimlWL
— ANI (@ANI) June 22, 2024