Sunita Williams : सुनीता विल्यम्सचा अंतराळ प्रवास दुसऱ्यांदा पुढे ढकलला

Sunita Williams : सुनीता विल्यम्सचा अंतराळ प्रवास दुसऱ्यांदा पुढे ढकलला

Bharat Live News Media ऑनलाईन ; सुनीत विल्यम्स तिसऱ्यांदा अंतराळ प्रवासाला जाणार होती. मात्र प्रवास सुरू होण्याच्या तीन मिनिटे आधीच संगणकाने मोजणी थांबवली. त्यानंतर हा प्रवास पुढे ढकलण्यात आला.
जगभरात ओळख मिळविलेल्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्सचा तिसरा अवकाश प्रवास शनिवारी अंतिम टप्प्यात पुढे ढकलावा लागला. यामागे तांत्रिक बिघाड असल्याचे सांगितले जात आहे. शेवटच्या क्षणी प्रवास थांबवावा लागल्याची घटना दुसऱ्यांदा घडली आहे. 7 मे रोजीही सुनीता विल्यम्सचे अंतराळयान निघणार होते तेव्हा प्रवास पुढे ढकलण्यात आला.
सहकारी अंतराळवीर बॅरी बुच विल्मोरसोबत नासाच्या बोइंग स्टारलाइनर कॅप्सूलमध्ये सुनीता उड्डाण करणार होती. प्रवास सुरू होण्याच्या तीन मिनिटे आणि 50 सेकंद आधी प्रक्षेपण थांबवण्यात आले. संगणकाने मतमोजणी का थांबवली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.