परभणी: गौर येथे कर्जास कंटाळून शेतकऱ्याने जीवन संपविले

परभणी: गौर येथे कर्जास कंटाळून शेतकऱ्याने जीवन संपविले

पूर्णा, Bharat Live News Media वृत्तसेवा:  गौर येथील एका प्रतिष्ठीत शेतक-याने राष्ट्रीयकृत बँकेचे घेतलेले पीक कर्ज तसेच खासगी फायनान्सचे कर्ज कसे फेडायचे? मुलाबाळांच्या शिक्षणाचा खर्च कशाने करायचा? या आर्थिक विवंचनेतून शेतातील अखाड्यावरील राहत्या घरी उंदराचे औषध प्राशन करुन आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना सोमवारी (दि.२७) घडली. या घटनेची नोंद चुडावा पोलीस ठाण्यात शुक्रवारी झाली.
या घटनेविषयी अधिक माहिती अशी की, गौर (ता. पूर्णा) येथील प्रतिष्ठीत शेतकरी शिवाजी पांडूरंग पारवे (वय ५६) यांनी आपल्या गौर शिवारातील अखाड्यावरील उंदाराचे औषध प्राशन केले.  यानंतर ते गुंगीत शेड बाहेर पडल्याचे  त्यांचा भाऊ बबन पांडुरंग पारवे यांना आढळले. त्यांनी चुलत बंधू श्रीकांत पारवे यांना बोलावून पूर्णा येथील खासगी दवाखान्यात शिवाजी यांना उपचारासाठी नेले. तेथे डॉक्टर नसल्यामुळे नांदेड येथे रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान त्यांची  प्राणज्योत मालवली.
अधिक तपास चुडावा पोलीस ठाण्याचे सपोनि नरसिंग पोमनाळकर करीत आहेत. या घटनेमुळे गौरसह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा 

परभणी : सेलू तालुक्यातील ३ गावे ३ महिन्यांपासून अंधारात
परभणी: मुलीस पळवून नेणाऱ्या तरुणाला ३ दिवसांची कोठडी
परभणी: परळी येथे सराईत चोरटा जेरबंद; २० दुचाकी जप्त