रोनाल्डोला अश्रू अनावर; किंग्स कप फायनलमधील पराभव लागला जिव्हारी

रोनाल्डोला अश्रू अनावर; किंग्स कप फायनलमधील पराभव लागला जिव्हारी

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : Cristiano Ronaldo : जगातील महान फुटबॉलपटूंमध्ये गणल्या जाणाऱ्या ख्रिस्तियानो रोनाल्डोची कामगिरी कितीही चमकदार असली तरी जेतेपद त्याला हुलकावणी देत आहे. अल नसर संघ सलग दुसऱ्यांदा किंग्स कप जिंकण्यात अपयशी ठरला.  अल हिलालविरूद्धच्या अंतिम फेरीत अल नासरला पराभव पत्करावा लागला. पराभवामुळे रोनाल्डोला अश्रू आवरता आले नाहीत. याआधी फिफा विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतरही तो भावूक झाला होता.
अंतिम सामन्याच्या सुरूवातीपासून दोन्ही संघानी आक्रमक खेळीचा अवलंब केला. सामन्याच्या सातव्या मिनिटाला अल हिलालच्या अलेक्झांडर मित्र्रोविचने सातव्या मिनिटाला गोल नोंदवून संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. ही आघाडी कमी करण्यासाठी अल नासरच्या रोनाल्डोसह आघाडीच्या खेळाडूंनी बॉल आपल्या ताब्यात ठेवत शॉर्ट पासिंग करत गोल करण्याचा प्रयत्न केला. परंतु, अल हिलालच्या बचावपटूंनी केलल्या भक्कम बचावामुळे अल नासरला पहिल्या हाफमध्ये गोल करता आला नाही.
सामन्याच्या दुसऱ्या हाफमध्ये अल हिललाने आघाडी कायम ठेवत दुसरा गोल करण्यासाठी प्रयत्न केले. परंतु अल नासरच्या गोलकीपरच्या उत्कृष्ट खेळीमुळे त्यांना गोल करण्यात यश आले नाही. सामन्यातील 56 व्या मिनिटाला अल नासरच्या डेव्हिडला अल हिलालच्या खेळाडूंवर फाउल केल्यामुळे रेफ्रींनी रेड कार्ड दिले. यानंतर सामन्याच्या 87 व्या मिनिटाला अल हिलालच्या अली अलबुलेही रेड कार्ड मिळाले. यामुळे दोन्ही संघ एका खेळाडूशिवाय उर्वरित सामना खेळत होते. सामन्याच्या 88 व्या मिनिटाला अल नासर जलद खेळीचा अवलंब केला. यावेळी अल नासरचा खेळाडू आयमन याह्याने मैदानी गोल करत संघाला सामन्यात पुनरागमन करून दिले.
यानंतर दोन्ही संघानी आक्रमक खेळीचा अवलंब करत निर्णायक आघाडी घेण्यासाठी अनेक चढाया रचल्या. परंतु, दोन्ही संघाच्या बचावफळीने शानदार खेळी केल्यामुळे निर्धारित वेळेत दुसऱ्या गोलची नोंद झाली नाही. निर्धारित 90 मिनिटा स्कोअर 1-1 असा बरोबरीत राहिला. यामुळे रेफ्रींनी सामन्याच्या निकाल लावण्यासाठी सामना एक्स्ट्रा टाईममध्ये खेळवला. यातही ही निर्णायक गोल न झाल्यामुळे सामना पेनल्टी शुटआऊटवर झाला. यात अल हिलालने अल नासरचा 5-4 अशा फरकाने पराभव करून स्पर्धेचे जेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात झालेल्या पराभवाचे दुख रोनाल्डो लपवू शकला नाही. तो मैदानावर पडून बराच वेळ रडत होता. या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

How do i explain to my kids that this man crying after Al Nassr lost to Al Hilal in a Saudi kings cup has won 5 Champions League titles all as the top scorer. #Ronaldo passion and desire to win is insane 🐐
pic.twitter.com/bUMELW4BxK
— Fleming Racool (@flemingracool) May 31, 2024