बिहारमध्ये तेजस्वी यादव यांचे व्हीलचेअरवरून मतदान

बिहारमध्ये तेजस्वी यादव यांचे व्हीलचेअरवरून मतदान

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : पटना साहिब आणि पाटलीपुत्र मतदारसंघात आज (दि.१) सकाळी अखेरच्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली. बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव आणि तेज प्रताप यादव यांनी एकत्र मतदान केले. दरम्यान, पाठदुखीमुळे तेजस्वी व्हीलचेअरवरून मतदान करण्यासाठी आले होते. दोघांनीही पटनाच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयातील बूथवर मतदान केले. त्यानंतर त्यांनी बोटावरील शाई दाखवली. तेजस्वीला गेल्या अनेक दिवसांपासून पाठदुखीचा त्रास होत आहे. तरी त्यांनी प्रचारात कोणतीही कसूर बाकी ठेवली नव्हती.
तेजस्वी यादव म्हणाले की, मतदान करण्यासाठी मी जनतेला घराबाहेर पडण्याचे आवाहन करेन. भाजपला संविधान, आरक्षण, लोकशाही संपवायची आहे. महागाई, बेरोजगारी आणि गरिबी वाढली आहे. परंतु, पीएम मोदींना याची पर्वा नाही, त्यांचे फोटोशूट सुरू आहे. बिहारमध्ये धक्कादायक निकाल येत आहेत आणि आम्ही 300 पार करत आहोत.

कसले एक्झिट पोल आणि कोणाच्या एक्झिट पोलवर विश्वास ठेवावा?, अनेक एक्झिट पोल आहेत. आपण 4 जूनची वाट पाहत आहे. आम्ही जे पाहिले त्यावरून आम्हाला विश्वास आहे की, 4 जूनरोजी भारतात आघाडी सरकार स्थापन होणार आहे. आणि एनडीए लवकरच सत्तेतून बाहेर पडणार आहे.

दरम्यान, शेवटच्या टप्प्यात बिहारमधील लोकसभेच्या आठ जागांवर मतदान होत आहे. आरके सिंग आणि पवन सिंग यांच्यासह अनेक दिग्गज निवडणूक रिंगणात आहेत. 2019 मध्ये, यापैकी सहा जागा भाजपने आणि दोन जागावर मित्रपक्ष जेडीयूने जिंकल्या होत्या. मात्र, यावेळी समीकरणे वेगळी आहेत.

#WATCH | RJD leaders Tejashwi Yadav, Tej Pratap Yadav cast their votes at a polling booth in Patna, Bihar #LokSabhaElections2024 pic.twitter.com/gl812QM3Oh
— ANI (@ANI) June 1, 2024

हेही वाचा

Lok Sabha Election 2024 | बिहारात चुरशीच्या लढती, नितीशकुमार, तेजस्वी यादव यांची प्रतिष्ठा पणाला
Tejashwi Yadav On Nitish Kumar: नितीश कुमार यांच्या पक्षाबद्दल तेजस्वी यादवांचे भाकीत म्हणाले, ‘जेडी(यू) संपेल…’
Land for job scam | बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना ‘ईडी’कडून पुन्हा समन्स