सिंधुदुर्ग : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात परुळेबाजार ग्रामपंचायत राज्यात प्रथम
वेंगुर्ले; Bharat Live News Media वृत्तसेवा : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात परुळेबाजार ग्रामपंचायतीने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. बहुप्रतिक्षित असा या स्पर्धेचा निकाल शुक्रवारी (दि.२३) शासनाकडून जाहीर करण्यात आला.
परुळेबाजार ग्रामपंचायतने २०१९-२० मध्ये द्वितीय क्रमांकाचे बक्षीस पटकावले होते. त्यांनंतर २०२०-२१ व २०२१-२२ या सलग दोन्हीही वर्षी प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकविले आहे. याबरोबरच निर्मल ग्राम पुरस्कार, यशवंत पंचायत राज पुरस्कार, स्मार्ट ग्राम, राष्ट्रीय पातळीवरील राष्ट्रीय पंचायत पुरस्कार असे विविधांगी यश मिळविले आहे. ग्रामपंचायतीने स्वच्छतेच्या नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. या सर्वांची पाहणी करून अभ्यास करण्यासाठी आतापर्यंत राज्यातील जिल्हापरिषदा, पंचायत समिती, ग्रामपंचायत यांनी भेटी दिल्या आहेत. माजी सभापती निलेश सामंत , मार्गदर्शक प्रदीप प्रभू, जिल्हा परिषदेचे अधिकारी, ग्रामपंचायत कार्यकारणी सदस्य, अंगणवाडी कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, शिक्षक, आशा स्वयंसेविका यांचा या यशात सहभाग होता, असे सरपंच प्रणिती आंबडपालकर यांनी सांगितले.
हेही वाचा :
PM Modi : पीएम मोदी आज करणार सहकार क्षेत्रातील महत्त्वाच्या उपक्रमांचे उद्घाटन
NCP Sharad Pawar Symbol | उद्या रायगडवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ‘तुतारी’ वाजणार
पंकज भुजबळांचा ताफा अडविल्याने भुजबळ आक्रमक; म्हणाले, आम्ही कुणालाही…
Latest Marathi News सिंधुदुर्ग : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात परुळेबाजार ग्रामपंचायत राज्यात प्रथम Brought to You By : Bharat Live News Media.