डॉ. गेडाम यांनी स्वीकारला नाशिक आयुक्त पदाचा पदभार

डॉ. गेडाम यांनी स्वीकारला नाशिक आयुक्त पदाचा पदभार

नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा- नाशिकच्या महसूल आयुक्त पदाचा कार्यभार राधाकृष्ण गमे यांच्याकडून डॉ. प्रवीण गेडाम यांनी स्वीकारला. गमे हे शुक्रवारी (दि. 31) सेवानिवृत्त झाल्याने शासनाने गेडाम यांची नियुक्ती केली. डॉ. गेडाम यांनी यापूर्वी नाशिक महापालिका आयुक्त म्हणून काम केलेले असून डॉ. गेडाम सध्या कृषी आयुक्त म्हणून कार्यरत होते.