अबब! नागपूरात तापमान 56 अंश सेल्सिअस पार

अबब! नागपूरात तापमान 56 अंश सेल्सिअस पार

नागपूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : भारतीय हवामान विभागाने नागपुरात चार स्वयंचलित हवामान सुरु केली आहेत. यामधील दोन हवामान केंद्रांमध्ये शुक्रवारी (दि.31) देशातील आजपर्यंच्या सर्वांत उच्च तापमानाची नोंद झाली आहे. ही गोष्ट नागपूरकरांसाठी धक्का देणारी ठरली आहे. नागपूरमधील महाराजबागेत पिकेव्हीच्या केंद्रावर 56 अंश सेल्सिअस तर सोनेगाव येथील एका केंद्रावर 54 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. हे तापमान उत्तर-पश्चिम दिल्लीतील 52.6 तापमानापेक्षाही अधिक असल्याने हे तापमानाच्या मोजमापावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. (Nagpur News)
उत्तर अंबाझरी रामदासपेठ येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या क्षेत्रात असलेल्या हवामान केंद्रामध्ये तब्बल 56 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. दुसरीकडे सोनेगाव येथील प्रादेशिक हवामान केंद्रामध्ये 54 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यासोबतच नागपूर – वर्धा रोडवरील खापरी येथील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ कॉटन रिसर्च (CICR) क्षेत्रामधील हवामान केंद्रावर तापमान 44 अंश सेल्सिअस दाखवले तर रामटेक हवामान केंद्रामध्ये 44 अंश सेल्सिअस तापमान होते. मग नागपुरात खरे तापमान किती? यावरून आज नागपुरात चर्चेला उधाण आले. (Nagpur News)
दिल्लीत विक्रमी 52.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
दोन दिवसांपूर्वी दिल्लीत विक्रमी 52.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी केंद्रावर देखील सर्वाधिक तापमान नोंद होत असल्याने ही गोष्ट चर्चेत आहे. याबाबत प्रादेशिक हवामान केंद्राच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, तीव्र उष्णतेच्या दिवसात स्वयंचलित हवामान यंत्राचा डेटा संदर्भासाठी वापरला जाऊ नये, कारण त्याचे सेन्सर्स ३८ अंश सेल्सिअसच्या पुढे निकामी होण्याची शक्यता असते. स्वयंचलित हवामान यंत्र सेन्सर सदोष आहेत. यामुळे ठराविक तापमानानंतर या नोंदी अविश्वसनीय ठरतात. सरासरी ३८ ते ४० अंशांपेक्षा कमी तापमानासाठी ते चांगले काम करतात. आवश्यक घटकांचा विस्तार एकरेषीय असणे आवश्यक आहे. परंतु उच्च तापमानात ही प्रक्रिया तिची रेखीयता गमावते,” असे आरएमसीमधील वरिष्ठ हवामान अंदाज शास्त्रज्ञानी स्पष्ट केले. (Nagpur News)
हेही वाचा : 

Smart Meter | महावितरणकडून स्मार्ट मीटर बसवण्यासाठी स्वतःपासून सुरुवात
Jalgaon Heat Stroke | उष्माघातामुळे भाजीविक्रेत्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू
उष्णतेचा आगडोंब, दिल्‍ली @ ५१.४ अंश सेल्सिअस; रेकॉर्ड ब्रेक तापमानाची नोंद

Latest Marathi News अबब! नागपूरात तापमान 56 अंश सेल्सिअस पार Brought to You By : Bharat Live News Media.