आम्ही निवडणुकीपुरते हिंदू नाही, आम्ही तर रामसेवक : उपमुख्यमंत्री फडणवीस

आम्ही निवडणुकीपुरते हिंदू नाही, आम्ही तर रामसेवक : उपमुख्यमंत्री फडणवीस

नागपूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (दि.30) अयोध्येत प्रभू श्रीरामांचे दर्शन घेतले. अयोध्येत दर्शन घेतल्यानंतर माझा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. आपल्या हयातीत राममंदिर होईल, हे ठावूक नव्हते. पण, मोदीजींचे आभार मानतो हे मंदिरही झाले. तसेच त्याचे दर्शन घेण्याची संधीही मला मिळाली. आम्ही निवडणुकीपुरते हिंदू नाही तर आम्ही रामसेवक आहोत. असे मत फडणवीस यांनी अयोध्येमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना मांडले. या बरोबरच सकाळी त्यांनी काशीमध्ये काशी विश्वनाथाचेही दर्शन घेतले.
अयोध्येत रामललांचे दर्शन घेतल्यानंतर श्री रामजन्मभूमी न्यासाच्या पुस्तिकेत देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या संदेश पुस्तिकेत त्यांनी लिहिले की, “ज्या रामाच्या मंदिर पुननिर्माणात कारसेवक म्हणून सेवा करण्याची संधी मला मिळाली. त्याच मंदिराचे पुननिर्माण झाल्यानंतर प्रत्यक्ष रामललांचे दर्शन घेण्याची संधी सुद्धा मला मिळाली, हे माझे परमभाग्य आहे. मी रामललांचे खूप खूप आभार मानतो. राष्ट्रीय पुनरुत्थानाच्या या यज्ञात आहुती देणार्‍या सर्वांना मी नमन करतो. विशेषत्वाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे, या न्यासाचे सर्व विश्वस्त आणि मंदिर निर्माणातील विश्वकर्मांच्या दुतांना मी प्रणाम करतो. जय श्रीराम.” अशा भावना त्यांनी न्यासाच्या पुस्तिकेत मांडल्या.
अयोध्येतील राममंदिरात दर्शन घेतल्यानंतर त्यांनी बांधकाम कामगारांसोबत छायाचित्र सुद्धा काढले. तसेच महाराष्ट्रातून दर्शनासाठी आलेल्या बंधू, भगिनींच्या भेटीसुद्धा घेतल्या. देवेंद्र फडणवीस यांना पाहताच या मराठी बांधवांनी 400 पार – मोदी सरकार’ असे नारेसुद्धा दिले. देवेंद्र फडणवीस यांनी यानंतर अयोध्येत श्री हनुमान गढी मंदिराचे सुद्धा दर्शन घेतले.
हेही वाचा : 

पैठण : भाजपच्या वतीने जितेंद्र आव्हाडांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन
विधानसभा निवडणूकीत भाजपलाच सर्वाधिक जागा : उपमुख्यमंत्री फडणवीस
मकरंद देशपांडे स्टारर अल्याड पल्याडचा थरार अनुभवायला मिळणार यादिवशी