सान्या मल्होत्राला ​​’मिसेस’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे नामांकन

सान्या मल्होत्राला ​​’मिसेस’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे नामांकन

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री सान्या मल्होत्रासाठी २०२४ हे वर्ष महत्त्वाचे ठरले आहे. ती तिच्या आगामी ‘मिसेस’ चित्रपटाने जागतिक चित्रपट महोत्सवांमध्ये चमक दाखवली आहे. ‘मिसेस’ मधील तिच्या दमदार अभिनयासाठी प्रतिष्ठित न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हल 2024 मध्ये ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’साठी तिला नामांकन मिळालं आहे. सान्यासाठी ही गोष्ट नक्कीच खास आहे.
अधिक वाचा – 

Anant Ambani Radhika Wedding | अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या विवाहाचा मुहूर्त ठरला !

राजश्री देशपांडे, प्रियांका बोस आणि तनिष्ठा चॅटर्जी यांसारख्या भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठित प्रतिभासह सान्या ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’ ची श्रेणी शेअर करणार आहे. ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ श्रेणीत, अमिताभ बच्चन, रोशन मॅथ्यू आणि इतरांना आपापल्या परफॉर्मन्ससाठी नामांकन मिळाले होते. फक्त सान्याच नाही तर या चित्रपटाची दिग्दर्शिका आरती कडव हिने सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाच्या श्रेणीत नामांकन मिळवले आहे.
अधिक वाचा – 

सैफ-सोहा अली खानच्या ‘या’ दुसऱ्या बहिणीबद्दल माहिती आहे का?

‘मिसेस’ हा स्त्रीत्व, नातेसंबंध आणि सामाजिक अपेक्षा यांच्या गुंतागुंतीचा शोध घेणारा हा चित्रपट आहे. सान्याकडे धर्मा प्रोडक्शनच्या ‘सनी संस्कार की तुलसी कुमारी’मध्ये ती वरुण धवनसोबत दिसणार आहे. या चित्रपटात जान्हवी कपूर आणि रोहित सराफ देखील दिसणार आहेत.
अधिक वाचा –

हॉट आहे शर्वरी वाघ; ‘मुंज्या’मध्ये तरस गाण्यावर जबरदस्त परफॉर्मन्स

 

View this post on Instagram

 
A post shared by Jio Studios (@officialjiostudios)