Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | मंगळवार, ७ मे २०२४

Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | मंगळवार, ७ मे २०२४

[author title=”चिराग दारूवाला :” image=”http://”][/author]

चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.
मेष : काही काळापासून सुरू असलेले अडथळे दूर करण्यात आज यश मिळेल.
काही काळापासून सुरू असलेले अडथळे दूर करण्यात आज यश मिळेल. त्‍यामुळे आत्मसमाधानाची भावना असेल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचं विशेष योगदान राहिल. कोणावरही अतिविश्‍वास ठेवू नका. तरुणांचे करिअरकडे दुर्लक्ष भविष्यासाठी नुकसानकारक ठरू शकते, अशी सूचना श्रीगणेश करतात. कार्यक्षेत्रात एखाद्या खास व्यक्तीशी झालेली भेट प्रगतीसाठी पूरक ठरेल. पती-पत्नीचे नाते अधिक घनिष्ठ होईल.
वृषभ : तरुणांनी त्यांच्या करिअरकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे
जमीन-मालमत्ता आणि गुंतवणूक यासारख्या कामांमध्ये तुम्ही व्यस्त राहू शकता, असे श्रीगणेश सांगतात. तुम्ही जबाबदारी स्‍वीकाराल. क्षमतेनुसार काम पूर्ण कराल. नकारात्मक विचार टाळा. निसर्गाच्‍या सानिध्‍यात थोडावेळ व्‍यतित करणे तुमच्‍यासाठी फायदेशीर ठरेल. तरुणांनी त्यांच्या करिअरकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहिल. तब्‍येतीच्‍या किरकोळ तक्रारी जाणवतील.
मिथुन : आज व्यक्तिमत्व अधिक चांगले करण्‍याकडे तुमचा कल असेल.
श्रीगणेश सांगतात की, आज व्यक्तिमत्व अधिक चांगले करण्‍याकडे तुमचा कल असेल. महत्त्वाच्या व्यक्तीची भेट फायदेशीर ठरेल. पैशाशी संबंधित कोणत्याही प्रकारची प्रकरणे निकाली काढू नका. वाहन किंवा घराच्या दुरुस्तीशी संबंधित कामांवर अधिक खर्च झाल्‍याने बजेट बिघडू शकते. नातेवाइकांशी चांगले संबंध ठेवण्यासाठी परिश्रम करावे लागतील. कार्यक्षेत्रात कार्यपद्धती बदलण्याची गरज आहे. कुटुंबासोबत खरेदी आणि आरामशी संबंधित गोष्टींमध्ये वेळ जाईल. हंगामी आजार त्रासदायक ठरू शकतात.
कर्क : कोणत्याही स्पर्धात्मक क्षेत्रात यश मिळण्याची उत्तम संधी आहे.
श्रीगणेश म्‍हणतात की, आज उत्सवात व्यस्त राहू शकता. काही कामात चांगले यश मिळाल्याने उत्साह वाढेल. कोणत्याही स्पर्धात्मक क्षेत्रात यश मिळण्याची उत्तम संधी आहे. करिअर आणि वैयक्तिक कामांमध्ये अहंकार आड येऊ देणार नाही, याची काळजी घ्‍या. घाईगडबड टाळा. एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीशी झालेली भेट तुमच्या व्यवसायात उपयुक्त ठरू शकते. कौटुंबिक वातावरण मधुर राहिल. आरोग्य चांगले राहू शकते.
सिंह : आज लाभाचे नवीन मार्ग मिळतील. कोणतीही दीर्घकाळची चिंता दूर झाल्‍याने मनःशांती लाभेल.
आज लाभाचे नवीन मार्ग मिळतील. कोणतीही दीर्घकाळची चिंता दूर झाल्‍याने मनःशांती लाभेल.आर्थिक बाबतीत ठोस आणि महत्त्वाचा निर्णयही यशस्वी होईल. विरोधकांच्या हालचालींकडे दुर्लक्ष करू नका. एखाद्या लहानसहान गोष्टीवरून वाद होऊ शकतो. स्वभावावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. मुलांचा ताण कमी करण्यासाठी त्यांच्यासोबत थोडा वेळ घालवा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. व्यवसायिक कामे व्यवस्थित चालू राहतील, जोडीदारासोबत काही वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. तणावामुळे थकवा आणि अशक्तपणा जाणवू शकतो.
कन्या: आज ग्रहमान अनुकूल आहे. याचा पुरेपूर फायदा घ्या. 
श्रीगणेश म्हणतात की, आज ग्रहमान अनुकूल आहे. याचा पुरेपूर फायदा घ्या. तुम्ही नवीन घर किंवा मालमत्ता घेण्याचा विचार करत असाल तर तुमचा निर्णय अगदी योग्य ठरेल. कामाचा अतिताण घेवु नका. विद्यार्थी कृतीपेक्षा विचारात अधिक वेळ व्‍यतित केल्‍याने यश हुलकावणी देईल.पती-पत्नीचे नाते मधुर राहील. पोटाशी संबंधित काही समस्या उद्भवू शकतात.
तूळ: तुमच्‍या वर्तनातून बिघडलेले संबंध सुधारण्यात यशस्वी व्हाल.
श्रीगणेश सांगतात की, आज तुम्‍ही तुमच्‍या वर्तनातून बिघडलेले संबंध सुधारण्यात यशस्वी व्हाल. सकारात्मक विचारसरणी आणि कर्मावर विश्वास ठेवल्याने परिस्‍थिती अनुकूल होईल. काही वेळा तुमचा आनंदी स्वभाव इतरांना त्रास देऊ शकतो. घरामध्येही एखाद्या छोट्या गोष्टीवरून कुटुंबातील सदस्यांसोबत गैरसमज होऊ शकतात. पती-पत्नीमध्ये वाद होण्‍याची शक्‍यता. आरोग्य उत्तम राहिल.
वृश्चिक : कार्यक्षेत्रात अधिक लक्ष देण्याची गरज आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहिल.
श्रीगणेश म्‍हणतात की, तुम्ही भावनिकदृष्ट्या मजबूत व्हाल. मनोरंजनात अधिक वेळ जाईल. कुटुंबासोबत धार्मिक स्थळी जाण्याचा कार्यक्रमही होईल. तुमच्या व्यक्तिमत्त्वातही सकारात्मक बदल अनुभवाल. अचानक काही अडचण आणि समस्या उद्भवू शकतात. सावधगिरीने तुम्ही त्यातून बाहेर पडाल. नकारात्मक कामांत असलेल्या लोकांच्या संपर्कात राहणे हे तुमच्यासाठी बदनामीकारक ठरु शकते. कार्यक्षेत्रात अधिक लक्ष देण्याची गरज आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहिल. आरोग्य उत्तम राहू शकते.
धनु : वाहन किंवा घराशी संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक ठेवा
आज अध्यात्मिक कार्यात रुची राहील. वाहन किंवा घराशी संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक ठेवा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. एखाद्या विशिष्ट विषयाबद्दल अतिमाहिती तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर नेऊ शकते. व्यावसायिक स्पर्धेत काही प्रमाणात नुकसान होऊ शकते. पती-पत्नीचे नाते अधिक गोड होऊ शकते.
मकर : विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळेल.
दैनंदिन दिनचर्या व्यवस्थित ठेवून विशेष प्रतिभा जागृत करण्यात वेळ जाईल. विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळेल. अति आत्‍मकेंद्री विचारांमुळे तुमच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवनावर नकारात्मक परिणाम होईल. एखाद्या धार्मिक उत्सवात गैरसमजामुळे कोणाशी वाद होऊ शकतो. कार्यक्षेत्रातील कामांमध्ये काही अडथळे येऊ शकतात. जोडीदाराशी वाद होऊ शकतो. आरोग्य उत्तम राहिल.
कुंभ :  वडिलधाऱ्यांचा स्नेह आणि आशीर्वाद तुमच्यावर राहील
वडिलधाऱ्यांचा स्नेह आणि आशीर्वाद तुमच्यावर राहील, असे श्रीगणेश सांगतात. गरजू मित्राला मदत केल्याने मानसिक समाधान लाभेल. कोणत्याही प्रकारे आपल्या तत्त्वांशी तडजोड करू नका. भावांसोबत गोड संबंध ठेवा. विद्यार्थी अभ्यासापासून विचलित होऊन चुकीच्या कामात गुंतू शकतात.तेलाशी संबंधित व्यवसायात फायदा होईल. अति कामामुळे कुटुंबाकडे लक्ष देऊ शकणार नाही.
मीन : तुम्ही तुमच्या समज आणि बुद्धीच्या जोरावर तुमची कामे योग्य प्रकारे पूर्ण करू शकाल.
श्रीगणेश सांगतात की, तुम्ही तुमच्या समज आणि बुद्धीच्या जोरावर तुमची कामे योग्य प्रकारे पूर्ण करू शकाल. नियोजनबद्ध पद्धतीने काम केल्यास मोठे यश मिळू शकते. घरात मित्र किंवा पाहुणे येण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासाबाबत कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण देऊ नये. पती-पत्नीचे नाते मधूर होईल.