Blood sample manipulation case : डॉ. अजय तावरेच्या जिवाला धोका : अंधारे

Blood sample manipulation case : डॉ. अजय तावरेच्या जिवाला धोका : अंधारे

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : कल्याणीनगर अपघात प्रकरणामध्ये अटकेत असलेला आरोपी डॉ. अजय तावरे याने माझ्याकडे भरपूर नावे आहेत कोणालाही सोडणार नाही, असे वक्तव्य केले. त्यामुळे त्याची सुरक्षितता महत्त्वाची ठरते. कारण या प्रकरणामध्ये मोठे प्रस्थ आहेत.
आरोपीला वाचवण्यासाठी सगळे प्रयत्न होऊ शकतात. त्यामुळे अजय तावरेच्या जीविताला धोका होऊ शकतो, असा गौप्यस्फोट शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. पुण्यामध्ये अंधारे यांनी बुधवारी पत्रकारांशी संवाद साधला, तेव्हा त्या बोलत होत्या. आर्यन खान प्रकरणाचे पुढे काय झाले, या प्रकरणामधील महत्त्वाच्या साक्षीदाराचा मृत्यू झाला.
त्यानंतर ललित पाटीलही बोलले माझ्याकडे अनेक नावे आहेत, पण पुढे चौकशीमध्ये काय बोलला काहीही समोर आले नाही. आता या प्रकरणामध्ये मोठे प्रस्थ आहे आरोपीला वाचवण्यासाठी सगळे प्रयत्न होऊ शकतात, असे अंधारे म्हणाल्या. तसेच, 4 जूनला मतमोजणी आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि पोलिसांवरचा ताण कमी व्हावा म्हणून कल्याणीनगर अपघात प्रकरण आणि आरोग्य खात्यातला सावळागोंधळ यासंबंधीचे काही धक्कादायक खुलासे निकालानंतर करेन. पण, तोवर डॉ. अजय तावरेच्या जीविताच्या सुरक्षिततेची काळजी नक्कीच वाटते. अंधारे म्हणाल्या, पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने तावरे याच्या जीविताला धोका आहे. दहा वर्षांत अजय तावरेने काय केले, हे समोर आले पाहिजे. तावडे फक्त रक्ताचा नमुना बदलण्यापुरता नाही. मंत्रालयाशी काय संबंध आहे, हे समोर यायला पाहिजे, असेही सुषमा अंधरे यांनी सांगितले.
हेही वाचा

Nashik | ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीवर पाण्यासाठी टाहाे अन् मोर्चा
Nashik | विशेष पोलिस महानिरीक्षक पदी दत्तात्रय कराळे
जिल्हा गौणखनिज चोरी; नियंत्रण पथकच तडजोडीत मग्न