येडियुराप्पांवर लैंगिक छळाचा आरोप करणार्‍या महिलेचा मृत्यू

येडियुराप्पांवर लैंगिक छळाचा आरोप करणार्‍या महिलेचा मृत्यू

बंगळूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्याविरुद्ध लैंगिक छळाचा आरोप करुन पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केलेल्या महिलेचा सोमवारी (दि. 27) मृत्यू झाला. श्वसनाच्या त्रासामुळे महिलेचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
श्वसनाच्या त्रासामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण, उपचारास प्रतिसाद न दिल्याने तिचा मृत्यू झाला. सदर महिलेने तिच्या अल्पवयीन मुलीवर येडियुराप्पांनी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. गेल्या (दि. 2) फेब्रुवारी रोजी ही घटना घडली होती. त्या दिवशी महिला आपल्या मुलीसह येडियुराप्पा यांच्या घरी गेली होती. येडियुराप्पा तिच्या मुलीसोबत सुमारे 9 मिनिटे बोलले होते. आपल्या बाजूला बसवून तिच्याशी ते बोलत होते. काही वेळातच त्यांनी तिला एका खोलीमध्ये नेले. त्यानंतर त्यांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप महिलेने केला होता.
महिलेने केलेल्या आरोपानंतर पोलिसंनी येडियुराप्पांविरुद्ध पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर हे प्रकरण सीआयडीकडे सोपवण्यात आले होते. तिच्या अकाली मृत्यूमुळे संशयाचे वारे जोरदार फिरत आहे.
हेही वाचा : 

विधानसभा निवडणूकीत भाजपलाच सर्वाधिक जागा : उपमुख्यमंत्री फडणवीस
कोल्हापूर : डोक्यात कुदळ घालून जन्मदात्या आईचा खून; मुलाला अटक
बेळगाव : उचगावच्या मळेकरणी देवस्थानमध्ये बकऱ्यांचा बळी देण्यास बंदी