वनविभागाकडून जोरदार तयारी सुरू; यंदाही पर्यटकांची गर्दी होणार

वनविभागाकडून जोरदार तयारी सुरू; यंदाही पर्यटकांची गर्दी होणार

घोटी, (जि. नाशिक) : Bharat Live News Media वृत्तसेवा  – अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या परिसरातील कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात काजवा महोत्सवात यावर्षी पर्यटकांनी हाउसफुल होणार असून, या महोत्सवाची अगोदरच बुकिंग फिक्स झाली आहे. काजव्यांसाठी भंडारदरा सजले आहे.
अकोले तालुक्यातील पश्चिमेला सह्याद्रीच्या पर्वतरांगेत असणाऱ्या कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात पावसाळ्याच्या अगोदर काजव्यांची चमचम सुरू होत असते. ही काजव्यांची चमचम म्हणजे पावसाची चाहूल असते. हिरडा, बेहडा, सादडा यासारख्या झाडांवर स्वयंप्रकाशित काजवा कीटक कोट्यवधींच्या संख्येने एकाच वेळेस लयबद्ध पद्धतीने चमकत असतात. काजवा महोत्सवासाठी होणारी गर्दी लक्षात घेता वनविभागाकडून जोरदार तयारी सुरू असून, पर्यटकांना काजव्यांचा व्यवस्थित आनंद घेता यावा म्हणून अभयारण्यातील असणाऱ्या प्रत्येक गावातील सदस्यांची आढावा बैठकही आयोजित केली गेली असल्याचे खात्रीलायक वृत्त हाती आले आहे. तर भंडारदऱ्यातील हॉटेल आनंदवन, हॉटेल यश, हॉटेल अमृतेश्वर, हॉटेल पंचशील, हॉटेल न्यू समाधान, महाराष्ट्र पर्यटन निवास, एव्ही कॅम्पिंग यांनीही पर्यटकांना काजवा महोत्सवात आकर्षित करण्यासाठी विशेष सवलती दिल्या असून, अनेक टेंटधारकही सवलतीच्या दरात काजवा बुकिंग करत आहेत. कोरोनाचे सावट आता पूर्णपणे नाहीसे झाल्याने गत तीन ते चार वर्षांपासून काजवा महोत्सव जोमाने सुरू झाला असून, यावर्षी मात्र भंडारदऱ्याचा काजवा महोत्सव हाउसफुल होणार आहे यात शंका नाही.
ॲडव्हान्स बुकिंग सुरू
हा काजव्यांचा चमत्कार बघण्यासाठी दरवर्षी २५ मे ते १५ जूनपर्यंत हजारो पर्यटक भंडारदऱ्यात दाखल होत असतात. याही वर्षी काजव्यांची चमचम वेळेवर सुरू होण्याची शक्यता असून, अनेक पर्यटकांनी आपल्याला काजव्यांचा हा करिष्मा व्यवस्थित बघता यावा म्हणून टेंट कॅम्पिंगधारक व हॉटेलमध्ये अॅडव्हान्स बुकिंग केली आहे. तर काही ऑर्गनायझर्सने काजवा महोत्सवामध्ये वेगवेगळे इव्हेंट आयोजित केले आहेत. अनेक आयोजकांनी पर्यटकांना काजवा महोत्सवात आकर्षित करण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेत आपली जाहिरात केली आहे.
हेही वाचा:

बर्फाळ प्रदेशातील हटके विवाह सोहळा!
डेन्मार्क सर्वात स्वच्छ देश
तडका : ‘कांटे की टक्कर’