पुणे : ‘सेट’बाबत हाताची घडी तोंडावर बोट

पुणे : ‘सेट’बाबत हाताची घडी तोंडावर बोट

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून सहायक प्राध्यापक पदासाठी अनिवार्य असलेली ’सेट’ महाराष्ट्र आणि गोवा राज्यात घेण्यात येते. 2023 मध्ये घेण्यात येणारी ’सेट’ नोव्हेंबर महिन्यात होणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले होते. प्रत्यक्षात नोव्हेंबर महिना निम्मा उलटला, तरी या परीक्षेबाबत कोणतीही हालचाल झालेली नाही. त्यामुळे विद्यापीठाला ’सेट’चा विसर पडला की काय, असा प्रश्न ही परीक्षा देणार्‍या उमेदवारांनी उपस्थित केला आहे.
महाराष्ट्र आणि गोवा राज्यात 26 मार्च 2023 ला सेट घेण्यात आली आणि संबंधित परीक्षेचा निकाल 27 जून 2023 ला जाहीर करण्यात आला. परंतु, संबंधित सेट ही 2022 मध्ये घेण्यात येणारी परीक्षा होती. विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात यूजीसीकडून सेट घेण्यासंदर्भात दिलेली मुदत संपल्यामुळे विद्यापीठाला 2022 मध्ये सेट घेताच आली नव्हती. त्यामुळे 2022 मध्ये सेट न घेता ती परीक्षा 26 मार्च 2023 ला घेण्यात आली. आता मात्र पुढील पाच वर्षांसाठी सेट घेण्याची विद्यापीठाला परवानगी मिळाली आहे. त्यामुळे 2023 या वर्षात घेण्यात येणारी सेट नेमकी कधी होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सेट मर्ज करण्याची कोणतीही नियमावली नाही. त्यामुळे विद्यापीठाला या वर्षीची ही परीक्षा घेणे अनिवार्य आहे. 2013 मध्ये देखील सेट दोनदा घेण्यात आली होती.17 फेब—ुवारी आणि 1 डिसेंबरला वर्षातून दोनदा परीक्षा घेण्यात आली. फेब—ुवारी महिन्यात झालेली परीक्षा ही 2012 या वर्षाची होती. त्यामुळे आता विद्यार्थ्यांचे एमएच सेट 2023 या सेटकडे डोळे लागले आहेत.
विद्यापीठाकडे सेट घेण्यासाठी आणि हे वर्ष संपण्यासाठी जेमतेम दीड महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे या वर्षात विद्यापीठ 2023 ची सेट घेणार की त्यासाठी 2024 उजाडणार, याकडे ही परीक्षा देणार्‍या उमेदवारांचे डोळे लागले आहेत. परीक्षा होणार की नाही आणि होणार असेल, तर कधी होणार, याबाबत विद्यापीठ प्रशासानाने भूमिका स्पष्ट करण्याची मागणी संबंधित उमेदवारांनी केली आहे.
हेही वाचा
Pune Drugs Case : ड्रग प्रकरणात आणखी चार आरोपींची नावे
मुंबई : कीर्तीकर-कदम वाद विकोपाला; मुख्यमंत्र्यांची डोकेदुखी वाढली
World COPD Day : धूर, धुळीचा फुफ्फुसावर जीवघेणा परिणाम
The post पुणे : ‘सेट’बाबत हाताची घडी तोंडावर बोट appeared first on पुढारी.

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून सहायक प्राध्यापक पदासाठी अनिवार्य असलेली ’सेट’ महाराष्ट्र आणि गोवा राज्यात घेण्यात येते. 2023 मध्ये घेण्यात येणारी ’सेट’ नोव्हेंबर महिन्यात होणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले होते. प्रत्यक्षात नोव्हेंबर महिना निम्मा उलटला, तरी या परीक्षेबाबत कोणतीही हालचाल झालेली नाही. त्यामुळे विद्यापीठाला ’सेट’चा विसर पडला की काय, …

The post पुणे : ‘सेट’बाबत हाताची घडी तोंडावर बोट appeared first on पुढारी.

Go to Source