Nanddurbar : ॲड. गोवाल पाडवी यांनी घेतली आघाडी

Nanddurbar : ॲड. गोवाल पाडवी यांनी घेतली आघाडी

Lok Sabha Election Results 2024 LIVE Updates : लोकसभा निवडणूकीची मतमोजणी सुरू झालेली आहे. मतमोजणीची फेरी पूर्ण होताना उमेदवारांची धडधड वाढत आहे. तर मतदारांमध्ये उत्सुकता वाढली असल्याने त्यांचे  लक्ष या निकालाकडे लागले आहे. काही ठिकाणचे निकाल देखील हाती येण्यास सुरूवात झालेली  आहे.
नंदुरबार मतदारसंघात पहिल्या फेरीत डॉक्टर हिना गावित यांना 16301 तर काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी यांना 35 हजार 697 मते पडली आहेत.
अधिकृत घोषित झालेल्या दुसऱ्या फेरीमध्ये अखेर काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी हे 32 हजार 748 मतांनी पुढे आहेत.
डॉक्टर हिना गावित यांना मिळालेली मते – 36 हजार 716
तर  गोवाल पाडवी यांना मिळालेले मते आघाडी घेत  69 हजार 464 मते पडली आहेत.
लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाच्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून आमदार ॲड के. सी. पाडवी यांचे पुत्र ॲड. गोवाल पाडवी यांच्याविरुध्द भाजपाकडून उमेदवार डॉक्टर हिना गावित असल्याने डॉक्टर विरुद्ध वकील या दोन उच्चशिक्षीत उमेदवारांमध्ये लढत रंगत आहे.
नंदुरबार लोकसभा मतदारसंघ घोषित झालेल्या तिसऱ्या फेरी अखेर काँग्रेसचे उमेदवार ॲड. गोवाल पाडवी 52 हजार 183 मतांनी पुढे आहेत.

गोवाल पाडवी – 1 लाख 7 हजार 33..

भाजपा उमेदवार डॉक्टर हिना गावित यांना मिळालेली मते  – 54 हजार आठशे पन्नास