दिल्ली-पंजाबसह ४ राज्यांना उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट

दिल्ली-पंजाबसह ४ राज्यांना उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट

नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा: हवामान विभागाने दिल्ली-पंजाबसह ४ राज्यांना उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी केला. देशाची राजधानी दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि राजस्थान या ४ राज्यांमधे २३ मे पर्यंत उष्णतेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट असेल. याशिवाय उत्तराखंड, गुजरात, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्ये उष्णतेची लाट (Weather forecast)  येण्याची शक्यता आहे. असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

मे महिन्यात उन्हाचा पारा वाढतच (Weather forecast) जात आहे. हवामान विभागाने तीव्र उष्णतेचा लाटेचा इशारा दिला आहे. दिल्ली, पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात आणि मध्य प्रदेशात कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक नोंदवले जावू शकते, असा इशारा हवामान विभागाने दिला. त्याचवेळी दिल्ली, हरियाणा, पंजाब, राजस्थानमध्ये उष्णतेच्या लाटेचा प्रभाव २३ मे पर्यंत राहण्याची शक्यता आहे.

#WATCH | IMD issues a red alert for Sunday in Delhi as the city experiences record-breaking heat. The temperatures can range between 28-44 degrees Celsius.
(Visuals from India Gate) pic.twitter.com/3WTBnFxetF
— ANI (@ANI) May 19, 2024

दिल्ली आणि राजस्थानमध्ये शनिवारी (१८ मे) तापमान ४६ अंश नोंदवले गेले. दिल्लीच्या मुंगेशपूरमध्ये ४६.८ अंश सेल्सिअस, नजफगडमध्ये ४६.७, पीतमपुरामध्ये ४६.१ आणि पुसामध्ये ४६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. राजस्थानच्या जैसलमेरमध्ये ४६.२, बारमेर ४६.९, गंगानगर ४६.३ आणि पिलानी ४६.३ तापमान (Weather forecast) होते.

दुसरीकडे, दक्षिण भारतातील कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.  तर जम्मूमध्ये शनिवारी कमाल तापमान ४१.६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे सामान्य तापमानापेक्षा ३ अंशांनी जास्त आहे. येत्या दोन दिवसांत जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

हेही वाचा:

Weather Report | महाराष्ट्रासह इतर राज्यांत उष्णतेची लाट; तर राज्यातील ‘या’ भागांत गारपिटीचा इशारा
Weather Update : शहराच्या काही भागांत अवकाळीची हजेरी; तापमानात घट
Weather Forecast: पुढील ३ दिवस राज्यातील ‘या’ भागात वादळी पाऊस तर कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा