हडपसर-गुवाहाटी रेल्वे पुन्हा ‘लेट’; वेटिंगमुळे प्रवासी हैराण

हडपसर-गुवाहाटी रेल्वे पुन्हा ‘लेट’; वेटिंगमुळे प्रवासी हैराण

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : हडपसरहून गुवाहाटीसाठी चालवण्यात येणारी विशेष रेल्वे गुरुवारी पुन्हा सहा तास उशिरा धावली. तब्बल सहा तास रेल्वे प्रवाशांना स्थानकावर गाडीची वाट पाहवी लागली. सातत्याने होणार्‍या वेटिंगमुळे प्रवासी हैराण झाले असून, प्रशासनाने उपायोजना कराव्यात, अशी मागणी प्रवाशी करत आहेत. पुणे रेल्वे स्थानकावरील अतिरिक्त बोजा कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हडपसर येथे टर्मिनल उभारले आहे.
रेल्वेकडून ‘हडपसर-गुवाहाटी’ ही विशेष गाडी हडपसर स्थानकावरून चालवण्यात येत आहे. या गाडीच्या एकूण 16 फेर्‍या येथून होणार आहेत. यातीलच ही दुसरी फेरी गुरुवारी (दि. 16) सकाळी 10 वाजता होणार होती. मात्र, पुन्हा ही गाडी उशिराच सुटली. गुरुवारी सकाळी 10 वाजता सुटणारी ही रेल्वे गाडी दुपारी 4 वाजता म्हणजेच सायंकाळी 6 वाजता उशिरा सुटली. त्यामुळे प्रवाशांंना मनस्ताप सहन करावा लागला.
हडपसर-गुवाहाटी गाडी पूर्वसीमांत रेल्वेची आहे. गुवाहाटीवरून हडपसरमध्ये रॅक (डबा) येण्यास जवळपास उशीर झाला. त्यामुळे हडपसरवरून गुवाहाटीला जाणार्‍या रेल्वेला 6 तास उशीर झाला आहे. प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगीर आहोत.
– रामपाल बडपग्गा, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, पुणे विभाग

रेल्वेने वेळापत्रक पाळावे
याबाबत प्रवासी म्हणाले, रेल्वे प्रशासनाने अशाप्रकारे उशिरा गाडी सोडणे चुकीचे आहे. यामुळे आम्हाला प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला. रेल्वे प्रशासनाने वेळापत्रकानुसार गाड्या सोडाव्यात.
हेही वाचा

काळची घ्या! तापमानातील बदलांमुळे फ्लूचे रुग्णांमध्ये वाढ
नरेंद्र मोदी यांच्यासारखाच पंतप्रधान पाकिस्तानला हवा
स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणी विभव कुमारांवर गुन्हा दाखल