वजन कमी करण्यासाठी ब्रोकोली गुणकारी

ब्रोकोली एक पौष्टिक भाजी आहे. जी अनेक आरोग्यदायी लाभांनी परिपूर्ण आहे. वजन कमी करण्यासाठी ब्रोकोलीचे सेवन हा एक चांगला उपाय असल्याचे तज्ज्ञ सांगतात. जर तुम्ही तुमचे वजन कमी करत असाल तर तुमच्या डाईटमध्ये ब्रोकोली नक्कीच सहभागी करावे, असा त्यांचा सल्ला आहे. १. ब्रोकोलीमध्ये कॅलरी खूप कमी प्रमाणात असते. केवळ एक कप मध्ये 31 कॅलरी असते. …

वजन कमी करण्यासाठी ब्रोकोली गुणकारी

ब्रोकोली एक पौष्टिक भाजी आहे. जी अनेक आरोग्यदायी लाभांनी परिपूर्ण आहे. वजन कमी करण्यासाठी ब्रोकोलीचे सेवन हा एक चांगला उपाय असल्याचे तज्ज्ञ सांगतात. जर तुम्ही तुमचे वजन कमी करत असाल तर तुमच्या डाईटमध्ये ब्रोकोली नक्कीच सहभागी करावे, असा त्यांचा सल्ला आहे.
१. ब्रोकोलीमध्ये कॅलरी खूप कमी प्रमाणात असते. केवळ एक कप मध्ये 31 कॅलरी असते. यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते. ब्रोकोलीच्या सेवनामुळे तुम्हाला वजन कमी करण्यास मदत होईल.
२. ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि फोलेट सारखे अनेक महत्त्वाचे पोषक तत्त्वे असतात. तसेच ब्रोकोली व्हिटॅमिन ए, पोटॅशियम, फायबरचा देखील एक चांगला स्रोत आहे. हे पोषक तत्त्त्त्वे तुमच्या शरीरासाठी आवश्यक असतात. जे वजन कमी करण्यासाठी मदत करतात.
३. ब्रोकोलीमध्ये कॅल्शियम कमी असते. जे एक असे खनिज आहे जे तुमच्या मेटाबॉलिज्मला चालना देते.
४. ब्रोकोलीमध्ये 90 टक्के पाणी असते. जे तुम्हाला हाइड्रेटेड ठेवण्यासाठी मदत करते. हाइड्रेटेड राहणे वजन कमी करण्यासाठी महत्त्वाचे असते.
 ५. ब्रोकोली एक बहुमुखी भाजी आहे. जिला अनेक प्रकारे शिजवले जाते. ब्रोकोलीला तुम्ही कच्चे किंवा स्टीम्ड, वाफवलेली, भाजलेली किंवा सॉल्टेड खाऊ शकतात. तसेच तुम्ही ब्रोकोलीला सूप, स्टू,कॅसरोल सोबत मिक्स करून खाऊ शकता.