बीड :  नांदुरघाट येथे आक्षेपार्ह पोस्टवरून दोन गटात तणाव

बीड :  नांदुरघाट येथे आक्षेपार्ह पोस्टवरून दोन गटात तणाव

केज; Bharat Live News Media वृत्तसेवा : केज तालुक्यातील नांदुरघाट येथे बुधवारी (दि.१६) निवडणुकीच्या कारणावरून एका नेत्याविरोधात सोशल मीडियावर पोस्ट टाकल्याने गावात तणाव निर्माण झाला. याप्रकरणी पोलीस आणि एका जखमी व्यक्तीच्या फिर्यादीवरून दोन गटात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले.
केज तालुक्यातील नांदूरघाट येथे बुधवारी एका व्यक्तीने सोशल मीडियावर निवडणुकीच्या संदर्भात एका नेत्याविरूद्धात पोस्ट सोशल मीडियावर टाकल्याने गावात तणाव निर्माण झाला आणि आजूबाजूच्या गावातील नेत्यांचे समर्थक एकत्र जमा झाले. जमाव नांदूरघाट येथे जमा होताच त्यांच्यात व प्रतिस्पर्धी गटात जोरदार हाणामारी झाली. केज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमावला आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र काठी, दगड एकमेंकावर भिरकावणाऱ्या जमावाला आटोक्यात आणणे पोलिसांना कठीण झाले. काठी व दगड एकमेंकावर भिरकावल्याने झालेल्या हाणामारीमध्ये एक व्यक्ती गंभीर जखमी झाला. ही माहिती मिळताच केज सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना, पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, पोलीस उपनिरिक्षक राजेश पाटील, पोलीस उपनिरिक्षक वैभव सारंग आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी हजर झाले. त्यांनी जमावाला काबूत आणले. याप्रकरणी १०० ते १५० जणांविरुद्धात केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा :

२० वर्षापासून जोपासलेली ४०० झाडांची फळबाग पाण्याअभावी होरपळली
गोंदिया: शिक्षक व संस्थापकाच्या वादात सेवानिवृत्त लिपिकाचा खून
Nashik News | वादळी पावसात बाभळीचे झाड अंगावर पडल्याने एकाचा मृत्यू