इस्रायलच्या रणगाड्यांनी आपल्याच पाच सैनिकांना उडवले

इस्रायलच्या रणगाड्यांनी आपल्याच पाच सैनिकांना उडवले

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : Israel Hamas War : गेल्या आठ महिन्यापासून सुरू असलेल्या इस्रायल-हमास युद्धात गुरुवारी (दि.16) एक विचित्र घटना घडली. ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. खरेतर इस्रायली रणगाड्याच्या हल्ल्यात त्यांचेच पाच सैनिक ठार झाल्याचे समोर आले आहे. उत्तर गाझामध्येही घटना घडली आहे. याबाबत स्वत: इस्रायलच्या लष्करी अधिका-यांनी माहिती दिली. या घटनेच्या चौकशीचे आदेश दिल्याचेही त्यांनी सांगितले.
आयडीएफच्या माहितीनुसार, या घटनेत स्टाफ सार्जंट रॉय बीट याकोव्ह (वय 22), स्टाफ सार्जेंट इलन कोहेन (20), स्टाफ सार्जेंट बेत्झालेल डेव्हिड शाशुआ (21) तर सार्जेंट गिलाड आर्येह बोइम (२२), सार्जेंट डॅनियल केमू (20) या पाच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर सात जवान जखमी झाले असून त्यातील तीन जण गंभीर आहेत, असे सांगितले आहे.