नविन महामार्गावर बेशरमाची झाडे लावून निषेध

नविन महामार्गावर बेशरमाची झाडे लावून निषेध

सेलू ,Bharat Live News Media वृत्तसेवा :शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ५४८ ब चे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. एक वर्ष ऊलटुनही पाच किलोमीटर अंतराची काम पूर्ण झाले नाही. संबंधित गुत्तेदाराने या रस्त्याची माती विकून सेलूकारांची माती केली आहे. या रस्त्यावरील डिव्हायडर मध्ये शोभेच्या झाडे लावण्यासाठी काळ्या मातीच्या ऐवजी सर्रास दगडांचा उपयोग केला जात आहे. आशा अनेक तक्रारी करत, गुरुवार १६ मे रोजी रस्त्याच्या दुभाजकावर, जयसिंग शेळके व त्यांच्या सहकाऱ्यांनी बेशरमाची झाडे लावून निषेध नोंदवला आहे.
दरम्यान ररस्त्यावरील पथदिवे दोन महिन्याच्या वर झाले तरी सुरू झाले नाहीत. यामुळे अपघात होत आहेत यात अनेक जण जखमी झाले आहेत. संबंधित राष्ट्रीय महामार्गाच्या इंजिनीयरला वारंवार माहिती देऊनही यांनी यावर काहीच ॲक्शन घेतली नाही .याचा निषेध म्हणून गुरुवारी या रस्त्यावरील डिव्हायडरच्या दगडावर रांगोळी काढून यावर बेशरमाची झाडे लावण्यात आली व निषेध करण्यात आला.असे निवेदनात नमूद केले आहे.तसेच अजूनही नीट कामे केली नाही तर याहून तिव्र आंदोलन सेलूवासियांतर्फे करण्यात येईल असा इशारा दिला आहे.
यावेळी जयसिंग शेळके, अक्षय सोळंके, रवि मोगल, नरेश पांचाळ,गणेश काचेवर, कैलास बोराडे, पांडुरंग सावंत, सतिश आकात, शिवम गटकळ, हाके , पप्पु कदम, लक्ष्मण बोराडे, प्रद्युम्न शेळके,विकी राठोड, विश्वंभर दिक्षित,परवेज सय्यद, इरफान बागवान आदींनी पुढाकार घेतला आहे.