कंगना रणौतच्या इमरजन्सीची रिलीज तारीख तिसऱ्यांदा पुढे ढकलली

कंगना रणौतच्या इमरजन्सीची रिलीज तारीख तिसऱ्यांदा पुढे ढकलली

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : हिमाचल प्रदेशातील मंडीमधून लोकसभेची निवडणूक लढणाऱ्या कंगना रनौतचा इमरजेन्सी चित्रपट पुन्हा पोस्टपोन झाला आहे. बुधवारी, तिच्या प्रोडक्शन बॅनर मणिकर्णिका फिल्म्सने सोशल मीडियावर एक निवेदन शेअर केले. ज्यामध्ये त्यांनी लिहिले की, ‘अभिनेत्री देशाप्रती तिचे कर्तव्य आणि देशसेवा करण्याच्या तिच्या वचनबद्धतेला प्राधान्य देते.’ अभिनेत्री कंगना रणौतने नुकतेच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता, त्यानंतर चाहत्यांच्या नजरा तिच्या राजकीय कारकिर्दीकडे लागल्या आहेत.
कधी कधी टळलीय ‘इमरजेन्सी’ची रिलीज डेट

कंगनाचा हा चित्रपट पुन्हा पोस्टपोन झाला आहे
पहिल्यांदा हा चित्रपट २४ नोव्हेंबर, २०२३ रोजी रिलीज होणार होता
आता १४ जून, २०२४ रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे
कंगना रानौतचा हा चित्रपट माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर आधारित आहे
‘मणिकर्णिका’ नंतर कंगनाचे दिग्दर्शन असणारा हा दुसरा चित्रपट आहे

चित्रपट कधी रिलीज होणार?
कंगना राणौतने या वर्षाच्या सुरुवातीला तिचा ‘इमर्जन्सी’ चित्रपट प्रदर्शित करण्याची घोषणा केली होती. पोस्टर रिलीज करत तिने सांगितले होते की, हा चित्रपट यावर्षी १४ जूनला रिलीज होणार आहे. पण, आता या चित्रपटासाठी चाहत्यांना अजून थोडी वाट पाहावी लागणार आहे.
प्रॉडक्शन हाऊसच्या पोस्टमध्ये काय लिहिलंय?
प्रोडक्शन हाऊसने एक पोस्ट शेअर केली आहे, जी कंगनानेही शेअर केली आहे. पोस्टमध्ये लिहिले आहे- ‘आमचे हृदय प्रेमाने भरले आहे, आजच्या काळात कंगना रणौतला ज्या प्रकारचे प्रेम मिळत आहे, ते पाहणे आपल्या सर्वांसाठी भाग्याची गोष्ट आहे’.
‘कंगना सध्या निवडणुकीच्या लगबगीत आहे. हा चित्रपट तिच्या हृदयाजवळ आहे, असे तिने एकदा सांगितले होते. निवडणुकीच्या कामात बिझी असल्यामुळे या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी तिला वेळ मिळत नसल्याची माहिती समोर आलीय.
‘इमर्जन्सी’ या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर कंगनाने २०२१ मध्ये या चित्रपटाची घोषणा केली होती. कंगनाने सांगितले होते की, हा इंदिरा गांधींचा बायोपिक नसून राजकीय ड्रामा फिल्म आहे. कंगनाशिवाय या चित्रपटात अनुपम खेर, मिलिंद सोमण, महिमा चौधरी आणि श्रेयस तळपदे यांच्याही भूमिका आहेत.

 

View this post on Instagram

 
A post shared by Manikarnika Films Production (@manikarnikafilms)

 

View this post on Instagram

 
A post shared by Manikarnika Films Production (@manikarnikafilms)

हेदेखील वाचा –

श्रेयस तळपदेने केलं पंतप्रधानांचं कौतुक; ‘नरेंद्र मोदी पुन्हा निवडून येतील, असं राजकीय वातावरण’
राखी सावंतची प्रकृती अचानक बिघडल्याने रुग्णालयात दाखल
Abha Ranta : ‘हिरामंडी’ च्या नव्या अभिनेत्रीची चर्चा; ‘लापता लेडीज’ फेम आभा रांटा आहे तरी कोण?