डेंग्यू रुग्ण नोंदणीसाठी यंत्रणा अपुरी; वर्षभरात केवळ 21 रुग्ण

डेंग्यू रुग्ण नोंदणीसाठी यंत्रणा अपुरी; वर्षभरात केवळ 21 रुग्ण

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : राज्यात गेल्या वर्षी पुणे शहरात डेंग्यूचे केवळ 21 रुग्ण आढळून आल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. शहरातील संसर्गजन्य आजारांची नोंदणी करणारी यंत्रणा अपुरी पडत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. तसेच, खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची माहिती कळवली जात नसल्याने रुग्णसंख्या कमी दिसत आहे.
दरवर्षी पावसाळ्यात डेंग्यूचा प्रादुर्भाव शहरात मोठ्या प्रमाणात वाढतो. खासगी रुग्णालयांमध्ये 60 टक्क्यांहून अधिक रुग्णांमध्ये डेंग्यूचे निदान होते आणि काही रुग्णांना रुग्णालयात दाखलही करून घ्यावे लागते. डेंग्यूच्या प्रादुर्भावाची नोंद आणि त्यादृष्टीने उपाययोजना करण्यात याव्यात, यासाठी महापालिकेकडून दरवर्षी खासगी रुग्णालयांना रुग्णांची माहिती कळवण्याचे आवाहन केले जाते. मात्र, बर्‍याच खासगी रुग्णालयांकडून उदासिनता दाखवली जात असल्याने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रत्यक्ष आकडेवारीमध्ये रुग्ण अत्यंत कमी असल्याचे दिसून येत आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाच्या
आकडेवारीनुसार, 2023 मध्ये शहरात डेंग्यूचे केवळ 21 रुग्ण आढळून आले, तर 2024 मध्ये 10 रुग्णांचे निदान झालेले आहे. सर्वाधिक डेंग्यूचे रुग्ण बृहन्मुंबई (335), नाशिक (88), सांगली- मिरज (72) येथे आढळून आले आहेत. डेंग्यूच्या वाढत्या संख्येवर मात करण्यासाठी आरोग्य विभागाने राज्यातील उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय आणि महापालिकेतील उपचार करणार्‍या एकूण 401 डॉक्टरांना डेंग्यू रुग्णांचे मेडिकल मॅनेजमेंट कसे करायचे याबाबत प्रशिक्षण दिले आहे. डेंगी आजाराच्या निदानासाठी राज्यात 43 सेंटिनल सेंटर्स स्थापन केलेली आहेत.
हेही वाचा

शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तके..!
शिक्षकांच्या बदल्यांवरील स्थगिती उठवली; शासनाने काढले परिपत्रक
बॅक वॉटरमध्ये बुडणाऱ्या बापाला वाचविण्यासाठी गेलेली मुलगी बुडाली