चंदगड : जंगमहट्टीत जमिनीच्या वादातून महिलेस मारहाण
चंदगड, Bharat Live News Media वृत्तसेवा : जंगमहट्टी गावातील महालक्ष्मी यात्रेला मंगळवारी (दि.14) प्रारंभ झाला. यात्रेमध्ये सामाईक वाटेवर चुल घालण्यासाठी मोठा वाद झाला. या वादातून मारहाण झाली या मारहाणीत एक महिला गंभीर जखमी झाली आहे. सुनिता सुनिल बाचुळकर (रा. कागणी ता. चंदगड) असे जखमी महिलेचे नाव आहे.
बातमीत नक्की काय?
गावातील ऐन यात्रेमध्येच भावकीत भांडण
यात्रेमध्ये जेवण बनवण्यावरुन वाद
चौघांकडून एका महिलेले मारहाण
यात्रेत जेवण कुठे करायचे यावरून मंगळवारी (दि.14) वाल्मिकी हुंदळेकर आणि सुनिता बाचुळकर यांच्यामध्ये भाऊबंदकीचा वाद उफाळून आला. दरम्यान झालेल्या वादात हुंदळेकर यांच्या कुटुंबियांनी शिवीगाळ आणि बेदाम मारहाण केल्याप्रकरणी वाल्मिकी देवाप्पा हुंदळेकर, देवाप्पा यशवंत हुंदळेकर, यशवंत देवाप्पा हुंदेळकर, रेणुका देवाप्पा हुंदळेकर (सर्व रा. जंगमहट्टी, ता. चंदगड) या चौघांविरुद्ध चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. सामाईक वाटेवर यात्रेचे जेवण बनवण्यासाठी चिऱ्याच्या दगडाची चुल लावण्यावरून हा वाद झाला. सुनिता बाचुळकर हीला दगडाने मारून गंभीर जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
हेही वाचा :
Dhule Lok Sabha Elections | गृहभेटीद्वारे सूक्ष्म नियोजनातून मतदान वाढीसाठी प्रयत्न करावा : विशाल नरवाडे
Jalgaon News | कुणाला मानधन कुणाला नाही, बीएलओंनी व्यक्त केला संताप; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
राखी सावंतची प्रकृती अचानक बिघडल्याने रुग्णालयात दाखल