पंतप्रधान मोदींवर आधारित दोन पुस्तकांचे प्रकाशन

पंतप्रधान मोदींवर आधारित दोन पुस्तकांचे प्रकाशन

नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीवर आधारित ‘मोदी दशक’ आणि ‘मोदी और भारतीय मुसलमान’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन मंगळवारी (दि.१४) झाले. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते, राज्यसभा खासदार सुधांशु त्रिवेदी आणि राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांच्या हस्ते पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी पुस्तकांचे लेखक शिवेश प्रताप आणि डॉ. कायनात काजी हे देखील उपस्थित होते.
दिल्लीत पंतप्रधान मोदी यांच्या कारकिर्दीवर आधारित शिवेश प्रताप लिखीत ‘मोदी दशक’ आणि डॉ. कायनात काजी लिखीत ‘मोदी और भारतीय मुसलमान’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागच्या दहा वर्षात केलेल्या कामगिरीवर आधारित ही दोन पुस्तके आहेत. प्रभात प्रकाशन संस्थेने ही पुस्तके प्रकाशित केली आहेत.
पुस्तक प्रकाशन सोहळ्यावेळी सुधांशु त्रिवेदी यांनी काँग्रेससह विरोधी पक्षावर हल्लबोल केला. “लोकसभा निवडणूकीत काँग्रेससह विरोधी पक्षांनी देशात किती मुस्लिमांना उमेदवारी दिली आहे? महाराष्ट्रात विरोधी पक्षांनी एकही मुस्लीम उमेदवार दिला नाही. दुसरीकडे भाजपने ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केले.“ असा हल्लाबोल त्रिवेदी यांनी पुस्तक प्रकाशनावेळी विरोधी पक्षावर केला.
तसेच भाजप प्रवक्ता शहजादा पूनावाला यांनीही काँग्रेसवर टीका केली. “भाजप मुस्लीमविरोधी नाही तर स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणून घेणारे पक्ष मुस्लीमविरोधी आहेत.” असा आरोप पूनावाला यांनी यावेळी केला. ‘मोदी और भारतीय मुसलमान’ या पुस्तकामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय मुस्लीमांसाठी केलेल्या विकास कामांविषयी, भारतीय मुस्लीमांची शैक्षणिक परिस्थिती याविषयावर विस्तृत लिखाण केले असल्याचे लेखक डॉ. कायनात काजी यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा :

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घाटकोपरमध्ये उद्या रोड शो
स्‍वाती मालीवाल यांच्‍याशी गैरवर्तन : ‘आप’ने सोडले मौन, संजय सिंह म्‍हणाले…
NDCC Bank Scam : शिक्षा स्थगितीसाठी सुनील केदार यांची उच्च न्यायालयात धाव