‘एमपी’त भाजप उमेदवारावर दगडफेक

‘एमपी’त भाजप उमेदवारावर दगडफेक

भोपाळ : शिवपुरी जिल्ह्यातील पिछोर विधानसभा मतदार संघात भाजप उमेदवार प्रीतम लोधी यांच्या प्रचार मिरवणुकीवर दगडफेक झाली. यात लोधी यांच्यासह त्यांचे 6 समर्थक जखमी झाले. वाहनांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. लोधी यांनी शिवपुरीतील काँग्रेस उमेदवार के. पी. सिंह कक्काजू यांच्यावर आरोप केला आहे. पराभव डोळ्यासमोर दिसत असल्याने काँग्रेस हताश झालेली आहे. ही दगडफेक त्याचेच द्योतक आहे, अशी प्रतिक्रिया लोधी यांनी दिली. पोलिसांत प्रकरण दाखल झाले आहे.
डुडी गावात अहिरवार जखमी
दुसर्‍या एका घटनेत जबलपूर जिल्ह्यातील पाटण विधानसभा मतदार संघात बहुजन समाज पक्षाचे उमेदवार अजय अहिरवार यांच्यावर जमावाने लाठ्या-काठ्यांनी हल्ला केला. यावेळी ते डुडी गावात प्रचार करत होते. अहिरवार हे जखमी झाले असून, त्यांनी अज्ञात लोकांविरुद्ध फिर्याद नोंदविली आहे.
 
The post ‘एमपी’त भाजप उमेदवारावर दगडफेक appeared first on पुढारी.

भोपाळ : शिवपुरी जिल्ह्यातील पिछोर विधानसभा मतदार संघात भाजप उमेदवार प्रीतम लोधी यांच्या प्रचार मिरवणुकीवर दगडफेक झाली. यात लोधी यांच्यासह त्यांचे 6 समर्थक जखमी झाले. वाहनांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. लोधी यांनी शिवपुरीतील काँग्रेस उमेदवार के. पी. सिंह कक्काजू यांच्यावर आरोप केला आहे. पराभव डोळ्यासमोर दिसत असल्याने काँग्रेस हताश झालेली आहे. ही दगडफेक त्याचेच द्योतक …

The post ‘एमपी’त भाजप उमेदवारावर दगडफेक appeared first on पुढारी.

Go to Source