राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, चिन्ह प्रकरणी सुनावणी ‘१६ जुलै’ला

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, चिन्ह प्रकरणी सुनावणी ‘१६ जुलै’ला

नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना देण्यात आले. या निर्णयाला शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान देत याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर मंगळवारी (१४ मे) सुनावणी होणार होती. मात्र, ती होऊ शकली नाही. त्यामुळे या याचिकेवर आता पुढील सुनावणी आता थेट ‘१६ जुलै’ला होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट निर्माण झाले. यानंतर दोन्ही गटांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचाच असल्याचा दावा केला. हा वाद पुढे निवडणूक आयोगात गेला. आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाचे घड्याळ चिन्ह हे अजित पवारांकडे देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. या प्रकरणी आज (१४ मे) सुनावणी होणार होती. मात्र ती होऊ शकली नाही सर्वोच्च न्यायालयाला १८ मे पासून ७ जुलैपर्यंत उन्हाळी सुट्टी आहेत. त्यामुळे दरम्यानच्या काळात या प्रकरणावर सुनावणी होणे शक्य नाही पुढील सुनावणीसाठी न्यायालयाने १६ जुलै ही तारीख दिली आहे.
“या प्रकरणात १९ मार्चला सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला नोटीस जारी केली होती आणि चार आठवड्यात त्यांचे उत्तर दाखल करण्यास सांगितले होते. ते अद्याप अजित पवार गटाने दाखल केलेले नाही. आणि त्यानंतर शरद पवार गटाला दोन आठवड्यात रिजॉईंडर दाखल करायचे होते. मात्र दोन्ही बाजूंनी अद्याप या गोष्टीची पूर्तता करण्यात आली नाही. यापुढे १६ जुलैला होणाऱ्या सुनावणीपूर्वी दोन्ही बाजूंना न्यायालयाने सांगितलेल्या बाबींची पूर्तता करावी लागणार आहे,” अशी माहिती सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांनी दिली.
हेही वाचा :

‘आयोडीनयुक्त मीठ’ संदर्भातील दंडाचा आदेश उच्च न्यायालयात रद्द
NDCC Bank Scam : शिक्षा स्थगितीसाठी सुनील केदार यांची उच्च न्यायालयात धाव
अमरराजे कदम यांची तुळजापुरच्या विकास प्रश्नासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट