अकोल्यात पोलिसासमोर दोन गटांत राडा

अकोल्यात पोलिसासमोर दोन गटांत राडा

अकोला; Bharat Live News Media वृत्तसेवा : लोकसभा निवडणूक प्रचाराच्या राजूर सभेत नेत्याबद्दल टीका-टिपणी केल्याने देवठाणमध्ये एका गटाने दुसऱ्या गटातील एकावर हल्ला केला. परिणामी दोन्हीही गट अकोले पोलीस ठाण्याच्या आवारात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसमोर एकमेकांना भिडले. याचा व्हिडिओ येथील सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
अकोले तालुक्यातील राजूर येथे लोकसभा निवडणूक प्रचार सभेमध्ये माकपाचे काँ. तुळशीराम कातोरे यांनी ठाकर समाजाचे नेते व पंचायत समितीचे माजी उपसभापती मारुती मेगाळ यांच्यावर आरोप-प्रत्यारोप केले. याप्रकरणी मंगळवारी (दि.१४) सकाळी देवठाण गावात दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वादाची ठेणगी पडली. त्यानंतर तुळशीराम कातोरे यांनी आपल्यावर हल्ला केल्याची तक्रार देण्यासाठी कार्यकर्त्यांसह पोलीस ठाण्याकडे धाव घेतली. त्यानंतर मारुती मेंगाळ यांनीही कार्यकर्त्यांसह पोलीस ठाणे गाठले. यावेळी दोन्ही गटात पोलीस ठाण्याच्या दारात पोलिसांसमोर जोरदार राडा झाला.
हेही वाचा :

उद्यापासून नागपुरातील होर्डिंग्जचे सर्व्हेक्षण; अवैध होर्डिंग संदर्भात प्रशासन हादरले
नागपुरातील महानगरपालिकेच्या १० मराठी शाळा बंद होणार
Threat to Tihar Jail: तिहार तुरुंगाला बॉम्बने उडवण्याची धमकी, प्रशासनाने दिली दिल्ली पोलिसांना माहिती