दिल्लीतील रुग्णालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : दिल्लीतील शाळांनंतर आता रुग्णालयांना पुन्हा बॉम्बने उडवण्याच्या धमक्या आल्या आहेत. ईमेलद्वारे बॉम्बची धमकी मिळाली आहे. यापूर्वी दिल्लीतील शाळा, रुग्णालये, विमानतळ आणि उत्तर रेल्वेच्या सीपीआरओ इमारतीला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली होती.
दीप चंद बंधू हॉस्पिटल, जीटीबी हॉस्पिटल, दादा देव हॉस्पिटल, हेडगेवार हॉस्पिटल यासह दिल्लीतील अनेक रुग्णालयांना बॉम्बच्या धमकीचे ईमेल मिळाले आहेत. शोध मोहीम सुरू असल्याचे दिल्ली अग्निशमन विभागाने सांगितले. यापूर्वीही अशा धमक्या मिळाल्या होत्या, गेल्या रविवारी दिल्लीतील २० हून अधिक रुग्णालये, आयजीआय विमानतळ आणि उत्तर रेल्वेच्या CPRO इमारतीला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती.
दिल्ली पोलिसांनी दिली होती माहिती
दिल्ली पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, रविवारी दुपारी दिल्लीच्या २० हॉस्पिटल्स आणि उत्तर रेल्वेच्या IGI आणि CPRO कार्यालयात बॉम्बस्फोट करण्याचा ईमेल आला. संजय गांधी रुग्णालय आणि बुरारी सरकारी रुग्णालय प्रशासनाने ईमेल पाहून पोलिसांना माहिती दिली.
३ मे रोजी दिल्लीतील नांगलोई भागात बॉम्ब असल्याच्या वृत्तामुळे खळबळ उडाली होती. पोलीस मुख्यालयात ईमेलद्वारे बॉम्बची धमकी मिळाली होती. तपासानंतर पोलिसांनी हा ईमेल पाठवणाऱ्याचा शोध घेतला. हा ईमेल एका अल्पवयीन व्यक्तीने पाठवला होता. पोलिसांनी त्याला पकडले होते. यापूर्वी दिल्लीतील २०० शाळांना एकाच वेळी बॉम्बने उडवण्याची धमकीही देण्यात आली होती.
हेही वाचा :
‘इंडिया’ आघाडी जिंकल्यास, मी ५ जूनला तुरुंगाबाहेर असेन : केजरीवाल
सलमान खान निवासस्थान गोळीबार प्रकरण- सहाव्या संशयिताला अटक
पाकला बांगड्या घालायला लावू : पंतप्रधान नरेंद्र मोदी