‘पतंजली आयुर्वेद’ विरुद्ध खटल्याचा निकाल सुप्रीम कोर्टाने ठेवला राखून

‘पतंजली आयुर्वेद’ विरुद्ध खटल्याचा निकाल सुप्रीम कोर्टाने ठेवला राखून

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : पतंजली आयुर्वेदाच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीप्रकरणी जाहिराती प्रसिद्ध केल्याबद्दल पतंजली आयुर्वेद विरुद्धच्या अवमानाच्या खटल्याची सर्वोच्च न्यायालयात आज ( दि. १४) सुनावणी झाली. न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्ला यांच्‍या खंडपीठाने निकाल राखून ठेवला आहे. दरम्‍यान,आजच्‍या सुनावणीवेळी योगगुरू बाबा रामदेव न्‍यायालयात उपस्‍थित होते.

Supreme Court reserves verdict in contempt of court case against Patanjali over misleading ads
report by @meera_emmanuel #SupremeCourtOfIndia #Patanjali https://t.co/NaAF72ABbN
— Bar and Bench (@barandbench) May 14, 2024

काय आहे प्रकरण ?
पतंजलीने आपल्‍या जाहीरातीमध्‍ये दावा केला होता की, योगामुळे दमा आणि मधुमेह ‘पूर्णपणे बरा’ होऊ शकतो. या जाहिरातीविरोधात गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये २०२३ मध्‍ये इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) वरिष्ठ अधिवक्ता पीएस पटवालिया यांनी याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींबाबत सल्लामसलत आणि मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याचे आदेश केंद्राला दिले होते. 21 नोव्हेंबर २०२३ रोजी झालेल्‍या सुनावणीत कंपनीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलाने सर्वोच्च न्यायालयाला आश्वासन दिले होते की, यापुढे कायद्याचे उल्लंघन होणार नाही.
काय आहे आयएमएचा आरोप?
आयएमएचा आरोप आहे की पतंजलीने कोविड-19 लसीकरणाविरोधात बदनामीकारक मोहीम चालवली होती. त्यावर न्यायालयाने पतंजली आयुर्वेदाच्या खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिराती तात्काळ थांबवाव्यात, असा इशारा दिला होता. विशिष्ट आजारांवर उपचार केल्याचा खोटा दावा करणाऱ्या प्रत्येक उत्पादनाला एक कोटी रुपयांपर्यंत दंड होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. कोविड-19 महामारीच्या काळात ॲलोपॅथिक फार्मास्युटिकल्सवरील वादग्रस्त टिप्पण्यांबद्दल आयएमएने दाखल केलेल्या फौजदारी खटल्यांचा सामना करणाऱ्या बाबा रामदेव यांनी ही प्रकरणे रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
मागील सुनावणीवेळी न्‍यायालय काय म्‍हणाले होते?
दिशाभूल करणार्‍या जाहिरांतीबाबत तुम्ही वृत्तपत्रांमध्‍ये प्रसिद्‍ध केलेला माफीनामाचे मूळ रेकॉर्ड का दिले नाही? तुम्ही ई-फायलिंग का केले? हा संवादाचा खूप अभाव आहे. तुमचे वकील खूप हुशार आहेत. हे जाणूनबुजून करण्यात आले आहे, अशा शब्‍दांमध्‍ये खडसावत  माफीनामा प्रसिद्ध केलेल्‍या वर्तमानपत्रांची मुख्य प्रत जमा करा, असा आदेश ३० एप्रिल रोजी सर्वोच्‍च न्‍यायालयाचे न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्ला यांच्या खंडपीठाने दिला होता.

Patanjali misleading ads: Supreme Court exempts Yog guru Baba Ramdev and Acharya Balkrishna from personal appearance in the case.
Supreme Court reserves its order on a contempt plea against Ramdev, Balkrishna and others. https://t.co/yroSAXzGHu
— ANI (@ANI) May 14, 2024

हेही वाचा :

Patanjali : ‘मला’ आणि पतंजलीला बदनाम करण्यासाठी मोठे षडयंत्र – रामदेव बाबा
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या दणक्यानंतर बाबा रामदेवांच्या पतंजलीची ‘सारवासारव’! 
Baba Ramdev Misleading Ads Case | बाबा रामदेव यांनी सुप्रीम कोर्टासमोर मागितली ‘बिनशर्त माफी’, ‘पतंजली’शी संबंधित प्रकरण काय?