केएल राहुल लखनौचे कर्णधारपद सोडणार? प्रशिक्षक क्लुसनर म्‍हणाले…

केएल राहुल लखनौचे कर्णधारपद सोडणार? प्रशिक्षक क्लुसनर म्‍हणाले…

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : यंदा इंडियन प्रीमियर लीग (IPL) हंगाम क्रिकेटपेक्षाही अन्‍य कारणांमुळेच अधिक चर्चेत आहे. यामध्‍ये आघाडीवर नाव आहे लखनऊ सुपरजायंट्सचा कर्णधार केएल राहुल याचे. या संघाचे मालक संजीव गोयंका यांनी मैदानावर केएल राहुल याला झापले. त्‍यांच्‍या याकृतीने क्रिकेट विश्‍वातील दिग्‍गजांसह त्‍याच्‍या चाहत्‍यांनी तीव्र निषेध केला आहे. आता केएल राहुल लखनौ संघाचे कर्णधारपद सोडणार, अशी चर्चाही होत आहे. त्याबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात होते. आता संघाचे सहाय्यक प्रशिक्षक लान्स क्लुसनर यांनी याबाबत खुलासा केला आहे.
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनौ सुपरजायंट्स यांच्यात सामना झाला. या सामन्‍यात लखनौला लाजिरवाण्‍या पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर लखनऊ फ्रँचायझीचे मालक संजीव गोयंका यांनी केएल राहुलशी ज्या पद्धतीने संवाद साधला त्याबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात होते. गेल्या दोन सामन्यांमध्ये राहुल कर्णधारपद सोडू शकतो आणि त्याच्या जागी निकोलस पूरनला कर्णधार बनवण्याची चर्चा होती.
राहुलने कर्णधारपद सोडले किंवा स्‍वीकारले तरी….
मंगळवारी पत्रकार परिषदेत लखनौ सुपरजायंट्सचे सहाय्यक प्रशिक्षक लान्स क्लुसनर म्‍हणाले, केएल राहुल कर्णधार पद सोडणार का याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. संजीव गोयंका आणि केएल राहुल यांच्यातील संभाषणात कोणतीही अडचण नाही. आम्हाला स्‍पष्‍ट बोलायला आवडते. यामुळे संघांची कामगिरी सुधारते. आमच्यासाठी ही फार मोठी गोष्ट नाही. राहुलने कर्णधारपद सोडले किंवा कर्णधारपदही स्वीकारले तरी त्याला सडेतोड उत्तरे देऊन मोसमाचा शेवट बॅटिंगने करायला आवडेल, असेही ते म्‍हणाले.
केएल राहुलची स्वतःची खास शैली आहे, त्‍यामुळे तो एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहे. हे आयपीएल त्याच्यासाठी कठीण आहे कारण आम्ही विकेट्स गमावत राहिलो, त्याला मुक्तपणे खेळण्याची संधी मिळाली नाही. राहुलला यंदाच्‍या हंगामात एक-दोन शतके झळकावायची होती;पण ते शक्‍य झाले नाही. मला वाटते की तो लवकरच मोठी खेळी खेळेल, असा विश्‍वासही त्‍यांनी व्‍यक्‍त केला.
लखनौचा संघही १२ गुणांसह सातव्या स्थानावर आहे. दिल्ली आणि आरसीबीसह अव्वल चार संघांमधून अजूनही बाहेर आहे. राहुल आणि त्याच्या संघाला पुढील सामन्‍यापूर्वी सरावाला पाच दिवसांचा कालावधी मिळाला आहे.
हेही वाचा : 

“तुम्हाला ४०० कोटींचा नफा मिळतोय” : केएल राहुलच्‍या अपमानवर सेहवाग भडकला
IPL 2024: पंचांशी वाद घालणे संजू सॅमसनला पडले महागात, BCCIने केली ‘ही’ कारवाई
धोनीचा आणखी एक मोठा विक्रम; IPL मध्ये अशी कामगिरी करणारा जगातील पहिला खेळाडू

 
 

Go to Source