लंडनच्या तरूणाने पुण्यात बजावला मतदानाचा हक्क

लंडनच्या तरूणाने पुण्यात बजावला मतदानाचा हक्क

पुणे, Bharat Live News Media वृत्तसेवा : जिल्ह्यातील मावळ, पुणे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात सोमवारी (दि.१३) मतदान पार पडले. डॉ. किरण तुळसे यांनी लंडनवरून येत मतदानाचा हक्क बजावला. परदेशातून पुण्यात येऊन मतदान केल्यामुळे डॉ. तुळसे हे स्थानिक नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरले.
पिंपरी चिंचवडमधील डॉ. किरण तुळसे यांनी सोमवारी (दि.१३) दुपारी आपल्या आई वडिलांसह थेरगाव येथील एम. एम. हायस्कूलमध्ये मतदान केले. तुळसे हे मागील सहा वर्षांपासून लंडन येथे स्थायिक आहेत. आई-वडिलांचा सामाजिक कार्याचा आदर्श डोळ्यापुढे ठेवत नोकरी करून कौटुंबिक जबाबदारी पार पाडत असताना मतदान करणे, ही देखील आपली राष्ट्रीय जबाबदारी आहे. हा विचार त्यांना मनात सतत येत होता. प्रत्येकाच्या एकेका मताने लोकशाही बळकट होत असते. त्यामुळे मी आवर्जून लंडन येथून फक्त या लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी आलो आहे, असे डॉ. तुळसे यावेळी सांगितले.
हेही वाचा :

चंद्रपूर : महाराष्ट्र सिमेलगतच्या साडेबारा गावातील नागरिकांचे तेलंगणात मतदान
Nandurbar Lok Sabha Election | नंदुरबार लोकसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी 65 पार
बेळगाव: चिकोडी लोकसभेसाठी जोरदार बेटिंग; काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी