रत्नागिरी : देवरुखनजीक कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

रत्नागिरी : देवरुखनजीक कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

साडवली; Bharat Live News Media वृत्तसेवा : देवरूख-रत्नागिरी मार्गावरील आंबव सुतारवाडी बसथांब्याजवळ कारची दुचाकीला जोरदार धडक बसून अपघात झाला आहे. या अपघातात मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाला तर मागे बसलेला एक जखमी झाला आहे. हा अपघात सोमवारी दुपारी 2.30 च्या सुमारास घडला. महेंद्र महादेव बारगुडे (42, रा. किरडुवे बारगुडेवाडी ता. संंगमेश्वर) असे मृत तरुणाचे नाव आहे.
महेंद्र बारगुडे हे आपल्या दुचाकीने (एमएच 08 एफ 1957) या मोटारसायकलने देवरूखहून आपल्या किरडुवे गावी जात होते. त्यांच्या पाठीमागे प्रवीण बारगुडे बसले होते. त्यांची दुचाकी आंबव सुतारवाडी बसथांब्याजवळ आली असता रत्नागिरीहून देवरूखच्या दिशेने येणार्‍या कारने (एम एच 09/ सी 7491) दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात महेंद्र बारगुडे हे गंभीर जखमी झाले. त्यांना देवरूख येथील शासकिय रूग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. तर त्यांच्या मागे बसलेले प्रवीण बारगुडे हे जखमी झाले आहेत. त्यांना रत्नागिरी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच देवरूखचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नामदेव जाधव व सहकारी कर्मचार्यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. रात्री उशिरापर्यंत अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया देवरूख पोलिस ठाण्यात सुरू होती.