मुंबईला वादळी वा-याचा तडाखा, होर्डिंगसह पार्किंग लिफ्ट कोसळून मोठा अपघात

मुंबईला वादळी वा-याचा तडाखा, होर्डिंगसह पार्किंग लिफ्ट कोसळून मोठा अपघात

मुंबई, Bharat Live News Media वृत्तसेवा : मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली. सोमवारी (दि.13) वडाळा हिल रोडवरील बरकत अली नाका येथे पार्किंगची लिफ्ट कोसळली. या घटनेत अनेक जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुंबई शहराला अचानक धुळीचे वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसाचा तडाखा बसल्याने ही घटना घडल्याचे समोर आले आहे.
अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी बचाव कार्यात मदत केली. या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये बांधकाम सुरू असलेला लोखंडी पार्किंग टॉवर रस्त्यावर कोसळताना दिसत आहे.

Sandstorm hits Mumbai, collapses structure – number of casualties unknown pic.twitter.com/C58T4J4dzm
— Shirish Thorat (@shirishthorat) May 13, 2024

दादर, कुर्ला, माहीम, घाटकोपर, मुलुंड आणि विक्रोळी या उपनगरांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली, तर दक्षिण मुंबईतील काही भागात रिमझिम पाऊस झाला. ठाणे, अंबरनाथ, बदलापूर, कल्याण आणि उल्हासनगर या भागांमध्येही सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस झाला.
यासोबतच, घाटकोपरमध्ये पंत नगरजवळील पेट्रोल पंपाच्या छतावर होर्डिंग पडल्याने सात जण जखमी झाले. दरम्यान बचावकार्य करताना मुंबई अग्निशमन दलाने सांगितले की, बचाव प्रक्रिया अजूनही सुरू आहे. अनेक लोक या ठिकाणी अडकल्याची शक्यता आहे. आतापर्यंतच्या बचाव कार्यात 47 लोकांना बाहेर काढण्यात यश आले आहे. जखमींना घाटकोपर पूर्व येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या बरोबरच घाटकोपर येथे होर्डिंग कोसळल्यामुळे उत्तरेकडील कामराज नगर येथे वाहतूक मंदावली होती, असे मुंबई वाहतूक पोलिसांनी सांगितले.

#WATCH | Maharashtra | 35 people reported injured after a hoarding fell at the Police Ground Petrol Pump, Eastern Express Highway, Pantnagar, Ghatkopar East. Search and rescue is in process: BMC
(Viral video confirmed by official) https://t.co/kRYGqM61UW pic.twitter.com/OgItizDMMN
— ANI (@ANI) May 13, 2024
हेही वाचा :

गरीब कुटुंबातील महिलेला वार्षिक १ लाख रुपये मिळतील : सोनिया गांधी
Aamir Khan : २५ वर्षांनंतर आमिर खानची ‘सरफरोश २’ ची घोषणा?
कल्याण डोंबिवलीत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस, आंबा पिकाला फटका