चंद्रपूर : कार-दुचाकी अपघातात दुचाकीस्वार ठार; पत्नी गंभीर

चंद्रपूर : कार-दुचाकी अपघातात दुचाकीस्वार ठार; पत्नी गंभीर

चंद्रपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : चिमूर -कान्पा महामार्गावरील शंकरपूर जवळील डोमा फाट्यावर कार व दुचाकीमध्ये झालेल्या भीषण झाला. अपघातात दुचाकीस्वार पतीचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली. ही घटना सोमवारी (दि.१३) दुपारी १२ च्या सुमारास घडली. श्रावण बापूराव गुरनुले (वय ४०) असे मृत पतीचे नाव आहे.
श्रावण गुरनुले हे चिमुर तालुक्यातील डोमा येथील रहिवासी आहेत. ते आज (दि.१३) पत्नी कल्पना यांच्यासोबत लावारी जंगलात तेंदूपत्ता तोडण्यासाठी दुचाकीवरून गेले होते. तेंदूपत्ता घेऊन गावी परत येत असताना चिमूर-कान्पा मार्गावरील डोमा फाट्यावर शंकरपूरकडे जाणाऱ्या कारची त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक बसली. या अपघातात श्रावण गुरूनुले यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की, घटनास्थळी दुचाकीने लगेच पेट घेतला. व दुचाकी काही क्षणात जळून खाक झाली. त्यानंतर त्यांच्यासोबत असलेल्या तेंदूपत्ता मजुरांनी कल्पना यांना जखमी अवस्थेत शंकरपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविले. तेथून त्यांना चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. तसेच श्रावण गुरनुले यांचा मृतदेह चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. अपघातानंतर पोलिसांनी कारचालकाला शंकरपूर येथील बस स्थानकाजवळ अडवून कार जप्त केली. व त्याच्यावर गुन्हा दाखल केला.
हेही वाचा : 

कोल्हापूर: यड्राव येथे भीषण अपघातात महिला ठार; १० जण जखमी 
धक्‍कादायक! : सीतापूर हत्‍याकांडाला नवे वळण; मोठ्या भावानेच आई, भावासह त्‍याची पत्‍नी आणि ३ मुलांना संपवले
बेळगाव: चिकोडी लोकसभेसाठी जोरदार बेटिंग; काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी