‘महिला मतदारांच्या चेहऱ्यावरील बुरखा हटवला, माधवी लतांवर गुन्हा

‘महिला मतदारांच्या चेहऱ्यावरील बुरखा हटवला, माधवी लतांवर गुन्हा


Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : तेलंगणात आज (दि.१३) चौथ्या टप्प्यातील लोकसभा मतदान होत आहे. दरम्यान (Lok Sabha Election 2024) मतदारांचे ओळखपत्र तपासल्याप्रकरणात हैदराबादमधील भाजप उमेदवार माधवी लता यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या संदर्भातील वृत्त ‘इंडिया टुडे’ने दिले आहे. माधवी लता ह्या हैदराबादमधून एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत.
‘या’ कलमान्वये भाजप उमेदवारावर गुन्हा
तेलंगणातील हैदराबाद लोकसभा मतदारसंघात मतदानादरम्यान भाजप उमेदवार माधवी लता यांचा मतदार ओळखपत्र तपासतानाचा व्हिडिओ समोर आला. यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. लता यांच्याविरोधात आयपीसीच्या कलम १७१ सी, १८६, ५०५(१)(सी) आणि लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम १३२ अन्वये मलकपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद (Lok Sabha Election 2024) झाला आहे.

Hyderabad: Case registered against BJP candidate Madhavi Latha after video of her checking voter ID cards surfaces
Read @ANI Story | https://t.co/EGnwe35fAG#Hyderabad #Telangana #MadhaviLatha #BJP #LokSabhaElections2024 pic.twitter.com/fJpHicrGDC
— ANI Digital (@ani_digital) May 13, 2024

Lok Sabha Election 2024 : व्हायरल व्हिडिओला अद्याप दुजोरा नाही
माधवी लतांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्या मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर बसलेल्या महिलांचे मतदार ओळखपत्र तपासताना दिसत आहेत. यावेळी माधवी लता महिलांना त्यांचे बुरखे तोंडावरून हटवत त्यांची ओळख पटवत आहेत. हा व्हिडिओ हैदराबादच्या जुन्या शहरातील एका मतदान केंद्राचा असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु या व्हायरल व्हिडिओला अद्याप विश्वासहार्य दुजोरा मिळालेला नाही. (Lok Sabha Election 2024)
‘मी पुरुष नाही तर महिला’; भाजप उमेदवाराचे स्पष्टीकरण
यानंतर एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या प्रतिक्रियेवर भाजप उमेदवार माधवी लता म्हणाल्या, “मी एक उमेदवार आहे आणि कायद्यानुसार, मला माझ्या भागातील मतदारांची मतदार ओळखपत्रे पाहण्याचा आणि तोंड मास्कशिवाय पाहण्याचा अधिकार आहे. मी पुरुष नाही तर महिला आहे. संबंधित महिलांना ‘मी तुमचे ओळखपत्र पाहू शकते का?’ अशी नम्रपणे विनंती केल्याचेही त्या म्हणाल्या. एखाद्याला या घटनेचा मोठा मुद्दा बनवायचा असेल तर त्याचा स्पष्ट अर्थ आहे की तो घाबरला आहे. असे म्हणत त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.
हैदराबादमध्ये चौथ्या टप्प्यात ‘ही’ महत्त्वाची लढत
आज सोमवार १३ मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात 10 राज्यांमधील 96 जागांवर मतदान होत आहे. यामध्ये हैदराबादच्या महत्त्वाच्या जागांवरही मतदान होत आहे. येथून भाजपने माधवी लता यांना उमेदवारी दिली आहे. त्याचवेळी एआयएमआयएमचे प्रमुख आणि विद्यमान खासदार असदुद्दीन ओवेसी हेही या जागेवरून निवडणूक लढवत आहेत. याशिवाय काँग्रेसबद्दल बोलायचे झाले तर, पक्षाने येथून मोहम्मद वलीउल्लाह समीर यांना उमेदवारी दिली आहे.
हेही वाचा:

हैदराबादमध्ये पावसाने हाहाकार; घराची भिंत कोसळून ४ वर्षाच्या मुलासह ७ जणांचा मृत्यू
Delhi excise policy case | लोकसभा निवडणुकीआधी BRS ला धक्का, के. कविता यांचा जामीन अर्ज फेटाळला
भाजपला सोलापुरात मोठे खिंडार; BRS प्रवेशासाठी १०० गाड्यांचा ताफा हैदराबादला रवाना
माझ्याविरुद्ध हैदराबादमध्ये लढा : ओवेसींचे राहुल गांधींना आव्‍हान

Go to Source