मतदारांच्या गळ्यात कापसाची व मक्याची माळ, अमळनेर तालुक्यातील घटना
जळगाव | लोकसभेच्या मतदान प्रक्रियेला आज सकाळपासून प्रारंभ झाला आहे. सकाळ पासून मतदार मोठ्या उत्साहाने घराबाहेर पडलेले होते. अमळनेर येथे मतदारांनी गळ्यात मका व कापसाच्या माळा घालून निषेध नोंदवला व मतदान केले. जळगाव लोकसभेचे उमेदवार करण पाटील यांची त्यांनी भेट घेतली.
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यांमध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये रावेर व जळगाव मतदार संघात 32 टक्के मतदान झालेले असताना प्रत्येक तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक मतदान करीत आहे. मात्र अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी कापसाला व मक्याला भाव मिळत नसल्याने, कापूस व मक्याची माळ गळ्यात घालून अंमळनेर या ठिकाणी मतदान केले. शेतकऱ्यांनी अशा अनोख्या पद्दतीने सरकारचा विरोध दर्शवला. जळगाव मतदार संघातील उमेदवार करण पाटील पवार यांची मतदारांनी भेट घेतली.
हेही वाचा –
सीबीएसई १० वी चा निकाल जाहीर, निकाल इथे पाहा
बेळगाव : सीमाभागात धुमाकूळ घालणारा चाळोबा गणेश हत्ती अखेर जंगलात परतला