रोटी लाटली, जेवण वाढले, गुरुद्वारात पीएम मोदींची सेवा; पाहा Photos

रोटी लाटली, जेवण वाढले, गुरुद्वारात पीएम मोदींची सेवा; पाहा Photos

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: लोकसभा निवडणूक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर पीएम मोदी आज (दि.१३) बिहार दौऱ्यावर आहेत. दरम्यान सभेपूर्वी त्यांनी येथील पटना साहिब गुरूद्वाराला (Narendra Modi) भेट दिली. यावेळी लंगरमध्ये त्यांनी सेवा दिली. या प्रसंगीचे फोटो एएनआय या वृत्तसंस्थेने शेअर केले आहेत.
PM मोदींनी परिधान केली शीख पगडी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी बिहारमधील पटना साहिब गुरुद्वार येथे भेट दिली आणि प्रार्थना केली. या प्रसंगी नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी रोटी लाटली. तसेच त्यांनी भाविकांना लंगरमध्ये जेवणही वाढले. यावेळी मोदींनी शीख पगडीदेखील परिधान केली होती. तसेच एका फोटोत पंतप्रधान गुरुद्वाराच्या आवारात एका लहान मुलाशी हस्तांदोलन करतानाही दिसतात.
लोकसभा पार्श्वभूमीवर पीएम मोदींचा बिहार दौरा महत्त्वाचा

बिहारमध्ये लोकसभेसाठी ७ ही टप्प्यात मतदान होत आहे.
येथे लोकसभेच्या ४० जागा आहेत.
सध्या नितीश कुमारांचा स्थानिक पक्ष जनता दल (संयुक्त) आणि भाजपची युती आहे.
जनता दलाचे प्रमुख नितीश कुमार हे बिहारचे मुख्यमंत्री आहेत.

Bihar: PM Modi performs ‘seva’ at Gurudwara Patna Sahib
Read @ANI Story | https://t.co/ZXxgMXxNE6#PatnaSahibGurudwara #Patna #Bihar #NarendraModi pic.twitter.com/DIswz4R4jE
— ANI Digital (@ani_digital) May 13, 2024

बिहारमधील पाटण्यात पीएम मोदींचा जोरदार रोड-शो
तत्पूर्वी रविवारी, पंतप्रधानांनी पाटणा येथे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि भाजप नेते रविशंकर प्रसाद यांच्यासह भव्य रोड शो केला. यावेळी खास डिझाइन केलेल्या वाहनावर उभे राहून पंतप्रधान मोदींनी रस्त्यांच्या कडेला जमलेल्या लोकांना अभिवादन केले. दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा भाजपचे झेंडे दिसत असल्याने संपूर्ण रस्ता भगव्या रंगांनी सजला होता आणि पक्षाचे हजारो कार्यकर्ते आणि समर्थकही भगव्या शाल आणि टोप्या परिधान करून पीएम मोदींच्या स्वागतासाठी उपस्थित होते. बिहारमधील पाटणा येथे काल (दि.१२ मे) झालेल्या पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील (Narendra Modi) हाय-व्होल्टेज रॅलीला लोकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला दिसला.
हेही वाचा:

Narendra Modi: ‘आमच्यासाठी प्रत्येक दिवस मातृदिन..’: ‘त्‍या’ चित्रांनी PM मोदींच्या चेहऱ्यावर फुलवले हास्य
PM Narendra Modi | अजितदादांसोबत या, सगळी स्वप्न पूर्ण होतील ; मोदींची शरद पवारांना थेट ऑफर
PM Narendra Modi Sabha Pune : पंतप्रधानांच्या ‘त्या’ पगडीने वेधले लक्ष

Go to Source