चेन्नईच्या मैदानात धोनी झाला भावुक

चेन्नई : वृत्तसंस्था : चेन्नई सुपर किंग्जने इंडियन प्रीमियर लीग २०२४ मधील घरच्या मैदानावरील शेवटच्या साखळी सामन्यात राजस्थान रॉयल्सवर विजय मिळवला. गुणतालिकेत ते १३ सामन्यांत १४ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर सरकले आहेत; पण हा सामना चाहत्यांना भावनिक करणारा होता. कारण, महेंद्रसिंग धोनीचा (Mahendra Singh Dhoni) हा चेपॉकवरील कदाचित शेवटचा सामना ठरू शकतो. चेन्नईने राजस्थान रॉयल्सवर ५ …

चेन्नईच्या मैदानात धोनी झाला भावुक

चेन्नई : वृत्तसंस्था : चेन्नई सुपर किंग्जने इंडियन प्रीमियर लीग २०२४ मधील घरच्या मैदानावरील शेवटच्या साखळी सामन्यात राजस्थान रॉयल्सवर विजय मिळवला. गुणतालिकेत ते १३ सामन्यांत १४ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर सरकले आहेत; पण हा सामना चाहत्यांना भावनिक करणारा होता. कारण, महेंद्रसिंग धोनीचा (Mahendra Singh Dhoni) हा चेपॉकवरील कदाचित शेवटचा सामना ठरू शकतो.

चेन्नईने राजस्थान रॉयल्सवर ५ विकेटस्नी मात करत प्ले- ऑफच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.
राजस्थान रॉयल्सच्या अडचणी काही प्रमाणात वाढल्या आहेत. राजस्थानने चेन्नईसमोर १४२ धावांचे लक्ष्य ठेवले होते, प्रत्युत्तरात चेन्नईने ५ गडी गमावून विजय मिळवला.
चेन्नईसाठी कर्णधार ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक ४२ धावांची नाबाद खेळी साकारली.
सलग तिसऱ्या पराभवामुळे राजस्थान रॉयल्स अजूनही काठावरच आहे.

धोनीचा घरच्या मैदानावरील शेवटचा सामना?
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सवर ४७ धावांनी विजय मिळवून प्ले-ऑफच्या शर्यतीतील आपले स्थान टिकवून ठेवले.
चेन्नईचा संघ प्ले- ऑफमध्ये पोहोचला नाही, तर हा त्यांचा घरच्या मैदानावरील शेवटचा सामना असेल, म्हणजेच धोनीला (Mahendra Singh Dhoni) शेवटचे होमग्राऊंडवर खेळताना पाहण्याची ही शेवटची संधी ठरेल. सामन्याच्या आधी फ्रँचायझीने चाहत्यांना सामना संपला तरी जाऊ नका, असे आवाहन केले होते. चेपॉकवरील चेन्नईचा हा पन्नासावा विजय ठरला आणि एकाच स्टेडियमवर असा पराक्रम करणारा तो तिसरा संघ ठरला. या सामन्यानंतर चेन्नईच्या सर्व खेळाडूंना पदक देऊन गौरविण्यात आले. धोनीच्या गळ्यात मेडल येताच स्टेडियम दणाणून गेले. धोनीने सर्व स्टेडियमवर राऊंड मारला आणि चाहत्यांना टेनिस बॉल व टी शर्ट भेट म्हणून दिली. सामन्यापूर्वी धोनी निवृत्ती जाहीर करणार अशी शक्यता ‘सीएसके’च्या पोस्टनंतर बोलून दाखवली जात होती. मात्र, आता ‘सीएसके’च्या प्ले- ऑफच्या आशा वाढल्या असल्याने ते पुन्हा चेपॉक स्टेडियमवर खेळण्याची शक्यता आहे.
धोनी IPL मध्ये सर्वाधिक ५०००+ धावा करणारा यष्टिरक्षक
धोनीने (Mahendra Singh Dhoni) ‘आयपीएल’मध्ये २६२ सामन्यांत ५, २१८ धावा केल्या आहेत. ‘आयपीएल’मध्ये त्याने ३६० चौकार व २५१ षटकार खेचले आहेत. यष्टींमागे धोनीने १५० झेल घेतले आहेत, तर ४२ स्टम्पिंग केले आहेत. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने २०१०, २०११, २०१८, २०२१ व २०२३ अशी पाच ‘आयपीएल’ जेतेपदे पटकावली आहेत. महेंद्रसिंग धोनी हा ‘आयपीएल’मध्ये सर्वाधिक ५०००+ धावा करणारा एकमेव यष्टिरक्षक आहे. माहीने यष्टींमागे सर्वाधिक १८४ बळी टिपले आहेत. कर्णधार म्हणून सर्वाधिक १३३ विजय हे त्याच्या नावावर आहेत.
हेही वाचा : 

चेन्नईचा राजस्थानविरूद्ध पाच गडी राखून विजय
रोहित-हार्दिक नव्‍हे, ‘मुंबई’साठी सेहवागने सुचवली ‘या’ खेळाडूंची नावे
कोहली मैदानात उतरताच रचणार इतिहास! ‘या’ बाबतीत बनणार जगातील पहिला क्रिकेटर